चोपडा महाविद्यालयात दि. 05 जानेवारी रोजी ‘वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाचे’ आयोजन
चोपडा:येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात दि. 05 जानेवारी 2026 रोजी स्मार्ट हॉल येथे सकाळी 10 वाजता गुणवंत विद्यार्थ्यांच्या ‘वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाचे’ आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲड. संदीप सुरेश पाटील हे उपस्थित राहणार असून या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून संस्थेच्या सचिव डॉ.सौ. स्मिताताई संदीप पाटील तसेच चोपडा नगरपालिकेचे मुख्याधिकारी राजनिवास झंवर व चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक महेश टाक, चोपडा नगर परिषदेचे नगरसेवक अमोल पाटील व चोपडा नगर परिषदेच्या नगरसेविका सौ. वंदना पाटील आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या मान्यवरांच्या हस्ते 70 हून अधिक गुणवंतांना रोख रक्कम, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
या वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रमाप्रसंगी पंचक्रोशीतील आजी- माजी गुणवंत विद्यार्थ्यांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. के. एन. सोनवणे, उपप्राचार्य प्रा. डॉ. आर. एम. बागुल, उपप्राचार्य प्रा. डॉ. ए. बी. सूर्यवंशी, समन्वयक डॉ. एस. ए. वाघ, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य पी. एस. पाडवी, पर्यवेक्षक ए. एन. बोरसे, महाविद्यालयाचे रजिस्ट्रार डी. एम. पाटील तसेच वरिष्ठ विभागातील पारितोषिक वितरण समारंभ प्रमुख डॉ. व्ही. आर. कांबळे व कनिष्ठ विभागाचे पारितोषिक वितरण समारंभ प्रमुख आर. ई. लांडगे यांनी केले आहे.
















