पाथर्डी तालुक्यातील दिव्यांगाचे बोगस प्रमाणपत्र काढूण नोकरी मिळवणाऱ्यांची नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी पोलिस कोठडीत रवानगी! सरकारी कर्मचारी वर्गात प्रचंड खळबळ
(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) संपूर्ण महाराष्ट्रात दिव्यांगाचे बोगस प्रमाणपत्र काढूण नोकरी मिळवणाऱ्यांची संख्या वाढली आहे.अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील चार जणांनी प्रशासनाला खोटी माहिती देऊन दिव्यांगाचे बोगस प्रमाणपत्र काढूण नोकरी मिळवली म्हणून चौघांच्या विरोधात अहिल्या नगर येथील तोफखाना पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.नविन वर्षाच्या पहिल्याच दिवशी त्यांना गजाआड व्हावे लागले आहे.त्यामध्ये पाथर्डी तालुक्यातील चार जणांचा समावेश आहे.१)भारत भागिनाथ फुंदे,(वय३४वर्षे), राहणार भुते टाकळी, तालुका पाथर्डी, जिल्हा अहिल्यानगर हा शेवगाव तालुक्यातील गदेवाडी येथे जिल्हा परिषदेच्या शाळेत प्राथमिक शिक्षक म्हणून नोकरी करीत होता.२) नागनाथ जगन्नाथ गर्जे,(वय३४वर्षे), राहणार,भगवान नगर,पाथर्डी शहर,हा वाशिम जिल्ह्यातील मंगळूरपीर येथिल तहसील कार्यालयात क्लार्क म्हणून नोकरी करीत होता.३)देविदास प्रकाश बोरूडे,(वय ३५वर्षे), राहणार, तनपूरवाडी, तालुका पाथर्डी जिल्हा अहिल्यानगर हा पुणे महानगर पालिकेच्या मुंढवा येथील शाळेत शिक्षक म्हणून नोकरी करीत होता.४) खंडेराव ज्ञानोबा फुंदे (वय३२ वर्षे), राहणार,भुते टाकळी,तालुका पाथर्डी,जिल्हा अहिल्यानगर अशी नविन वर्षाच्या पहिल्याच दिवशी गुरूवारी एक तारखेला सायंकाळी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीची नावे आहेत.या चार जणांनी अहिल्या नगर येथील ग्रामीण सरकारी रुग्णालयातील काही कर्मचाऱ्यांना आर्थिक चिरीमिरी देऊन हताशी धरून रुग्णालयात कोणत्याही प्रकारची वैद्यकीय तपासणी आणि नोंदणी न करताच थेट ऑनलाईन पद्धतीने पोर्टलवर खोटी माहिती भरून दिव्यांगाचे बनावट प्रमाणपत्र काढून शासनाची फसवणूक केली आहे.हा प्रकार जेव्हा दिव्यांगाच्या कागदपत्रांची तपासणी केली तेव्हा लक्षात आला आहे.या प्रकरणा बाबद जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अहिल्या नगर येथील तोफखाना पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला आहे.अहिल्या नगर जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे साहेब,अप्पर पोलीस अधिक्षक वैभव कलबुर्मे साहेब,यांच्या मार्गदर्शनाखाली उप अधीक्षक गणेश उगले साहेब हे करीत आहेत. गणेश उगले साहेबांनी गणेशोत्सव काळात शेवगाव येथे तात्पुरता पदभार सांभाळला होता. या काळात चांगले काम करणाऱ्या गणेशोत्सव मंडळांना त्यांच्या हस्ते पारितोषिके देउन गौरविण्यात आले होते. या गुन्ह्याच्या प्रकरणातील जिल्हा रुग्णालयातील गैर कारभारात सहभाग असणाऱ्या एका संशयित कर्मचाऱ्यांचा मृत्यू ही झाला आहे. तर तिन जणांना अटक पुर्व जामिन मिळाला आहे.नविन वर्षाच्या पहिल्याच दिवशी एक तारखेला गुरूवारी सायंकाळी चार जणांना अटक करण्यात आली आहे.त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी सुनावली आहे. दिव्यांगाचे बनावट प्रमाणपत्र काढून नोकरी मिळवनाऱ्यांना अटक झाल्यामुळे संपूर्ण राज्यभर खळबळ उडाली आहे.यामुळे बोगस प्रमाणपत्र काढणारांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. दिव्यांगाच्या कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर महाराष्ट्रात अजूनही अनेक ठिकाणी दिव्यांगाचे बनावट प्रमाणपत्र काढून सरकारी नोकरीवर डल्ला मारणाऱ्यांची संख्या वाढणार असल्याचे पोलिस तपासात पुढे येत आहे.

























