मानवसेवा प्रतिष्ठानचे कार्य पाहून पुण्यातील आदर्श लेखिका वसुधा नाईक भारावल्या, निवारा केंद्रास आकरा हजारांच्या वस्तू देउन केली होळी साजरी

मानवसेवा प्रतिष्ठानचे कार्य पाहून पुण्यातील आदर्श लेखिका वसुधा नाईक भारावल्या, निवारा केंद्रास आकरा हजारांच्या
वस्तू देउन केली होळी साजरी

(सुनिल नजन “चिफ ब्युरो”/अहमदनगर जिल्हा स्पेशल क्राईम रिपोर्टर) अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मोहोज खुर्द येथील मानवसेवा प्रतिष्ठानचे कार्य हे समाजाला अतिशय प्रेरणादायी आहे.अनेकांनी हा आदर्श घेऊनच पुढे समाजसेवेची वाटचाल केली पाहिजे असे प्रतिपादन पुण्यातील प्रसिद्ध लेखिका, आदर्श शिक्षिका आणि जेष्ठ समाजसेविका वसुधा नाईक यांनी केले.त्या राष्ट्रीय पर्यावरण बहुउद्देशीय संस्था भारत आणि पोलिस मित्र महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पाथर्डी तालुक्यातील मोहोज खुर्द येथील निवारा केंद्रातील गोरगरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, वस्त्र दान वितरण आणि व्रुक्षारोपन ईत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमा प्रसंगी अध्यक्ष पदावरून त्या बोलत होत्या.या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सुभाषशेठ चोरडिया,आबासाहेब कराळे, नितिनशेठ नाईक, शारदा नाईक हे आवर्जून उपस्थित होते.प्रारंभी मानवसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.डाॅ.सुनिल मतकर यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या माध्यमातून आज पर्यंत केलेल्या विविध कामाचा आढावा घेतला.यावेळी निवारा केंद्रातील एकूण २८ विद्यार्थी उपस्थित होते. वसुधा नाईक यांनी निवारा केंद्रातील सर्व विद्यार्थ्यांच्या बारीक सारीक गोष्टींची चौकशी करीत आदराने हितगुज केले. आणि समाजसेवेचे व्रत घेतलेल्या मानवसेवा प्रतिष्ठानच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल समाधान व्यक्त करीत वसुधा नाईक यांनी स्वतः लिहिलेली “गुंजन मनीचे”आणि “शतक नाविन्यपूर्ण उपक्रमांचे” ही पुस्तके मानवसेवा प्रतिष्ठानला भेट दिली. या कार्यक्रमास आदर्श अंगणवाडी सेविका सौ. अलका मतकर,नंदा मतकर,राधाकिसन गायके, देविदास मतकर यांच्या सह पंचक्रोशीतील अनेक मांन्यवर उपस्थित होते.आभार शुभम मतकर यांनी मानले.विद्यार्थ्यांच्या प्रिती भोजना नंतर होलिका दहनाचे आयोजन करण्यात आले होते.समाजसेवा करताना ग्रामीण भागातील हिंदू संस्कृतीचे दर्शन यावेळी घडले.होलिका दहनाचे आयोजन आणि गावातील लोकांचे राहणीमान पाहून नाईक यांचे चांगले पर्यटन झाल्याचे त्यांनी सांगितले.भविष्यातही या निवारा केंद्रास विषेश सहकार्य केले जाईल असे आश्वासन देत त्यांनी निवारा केंद्राचा निरोप घेतला.एक वारसा समाजसेवेचा या उपक्रमाच्या निमित्ताने पहावयास मिळाला.