Home पाचोरा श्री.गो.से.हायस्कूल.मध्ये संत सेवालाल महाराज जयंती साजरी

श्री.गो.से.हायस्कूल.मध्ये संत सेवालाल महाराज जयंती साजरी

श्री.गो.से.हायस्कूल.मध्ये संत सेवालाल महाराज जयंती साजरी

 

 

 

 

दिनांक 15/ 2 /2026 रविवार रोजी श्री.गो.से.हायस्कूल.मध्ये बंजारा समाजातील महान संत व समाज सुधारक “संत सेवालाल महाराज” यांची जयंती साजरी करण्यात आली.

सर्वप्रथम संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण विद्यालयाच्या पर्यवेक्षिका अंजली गोहिल व पर्यवेक्षक

आर.बी.तडवी.यांच्या हस्ते संपन्न झाली. मुख्याध्यापक एन. आर. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम घेण्यात आला यावेळी मंचावर ज्येष्ठ शिक्षक पी.एम.पाटील, ज्येष्ठ शिक्षिका प्रतिभा पाटील, रुपेश पाटील उपस्थित होते.

आर.बी.बोरसे. यांनी विद्यार्थ्यांना संत सेवालाल महाराज यांनी केलेल्या समाज उद्धारासाठी अंधश्रद्धा निर्मूलन कार्य तसेच नैतिक शिक्षण देऊन जनजागृतीचे कार्य कसे केले याविषयी विद्यार्थ्यांना सांगितले.

या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी व शिक्षक बंधू-भगिनी उपस्थित होते.

Don`t copy text!