पाचोऱ्यात गो.से. हायस्कूलला विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत

गो.से. हायस्कूलला विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत

पाचोरा(प्रतिनिधी) पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री गो से हायस्कूल येथे-शैक्षणिक वर्ष २०२२-२३ सुरू झाले असून आज पहिल्या दिवशी शाळेत सकाळ सत्रात ५वी ते ७ वी आणि दुपार सत्रात ८वी च्या विद्यार्थ्यांचे श्री गो से हायस्कूल प्रांगणात संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार.दिलीप वाघ आणि चेअरमन .संजय वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी शालेय इमारत पताका आणि फुलांनी सजवण्यात आली होती. तांत्रिक विभाग चेअरमन वासुदेव महाजन यांच्या हस्ते सकाळ सत्रातील विद्यार्थ्यांचे स्वागतगीतासह गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले तर नवीन शैक्षणिक वर्षात पदार्पण करणाऱ्या या विद्यार्थ्यांना प्रत्येक वर्गाची शालेय पुस्तके देखील वाटण्यात आली. पालकांचाही सन्मान करण्यात आला.
यावेळी संस्थेचे व्हाईस चेअरमन व्ही टी जोशी व मुख्याध्यापक सुधीर पाटील,तांत्रिक विभाग चेअरमन वासुदेव महाजन,उपमुख्याध्यापिका प्रमिला वाघ, पर्यवेक्षक एन आर पाटील, आर एल पाटील, ए बी अहिरे, तांत्रिक विभाग प्रमुख शरद पाटील, किमान कौशल्य विभाग प्रमुख मनिष बाविस्कर, कार्यालय प्रमुख अजय सिनकर, सांस्कृतिक प्रमुख रहीम तडवी .शाळेतील सर्व शिक्षक,शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी उपस्थित होते. स्वागत समारंभ संपल्यानंतर शालेय समिती व संचालक मंडळासमोर शैक्षणिक वर्ष २०२२-२३ संबंधी वार्षिक नियोजन समोर ठेवण्यात आले व त्यानुसार कामकाज करावे असे सर्वानुमते ठरले. यावेळी विद्यार्थ्यांमध्ये उत्साह नवचैतन्य दिसून आले शाळेतील प्रसन्न वातावरण पाहून विद्यार्थी व पालक भारावले