शासकीय रेखाकला ग्रेड परीक्षेत रंगश्रीचे घवघवीत यश
शासकीय रेखाकला चित्रकला ग्रेड परीक्षा 2025-26 एलिमेंटरी व इंटरमिजिएट चित्रकला परीक्षेत रंगश्री आर्ट फाऊंडेशन, ड्रॉईंग अँड पेंटिंग क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. दरवर्षाप्रमाणे रंगश्री आर्ट चा निकाल यंदाही शंभर टक्के लागला आहे.या परीक्षेत रंगश्रीचे 25 विदयार्थी ‘A’ श्रेणीत उत्तीर्ण झालेत.
इलेमेंटरी :-
अ’ श्रेणीत 8विद्यार्थी
ब’ श्रेणीत 13 विद्यार्थी उत्तीर्ण आणि शेकडा निकाल 100%
इंटरमिजिएट ग्रेड :-
‘अ’ श्रेणीत 17 विद्यार्थी,
‘ब’- श्रेणीत 8 विद्यार्थी उत्तीर्ण आणि शेकडा निकाल 100% लागला.
या ग्रेड परीक्षेतून विद्यार्थ्यांना 10 वी च्या निकालात सवलतीचे गुण मिळतात आणि यातूनच विद्यार्थ्यांना कलेच्या क्षेत्रात प्रवेशासाठीची पहिली पायरी मिळत असते. या विद्यार्थ्यांना श्री.सुबोध कांतायन सर व सौ.भारती कांतायन मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले. या घवघवीत यशासाठी त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

























