खासदार इम्तियाज जलाल यांनी धनगर आणि मुस्लिम समाज आरक्षणासाठी लोकसभा गाजवत मराठा आरक्षणाचे नेते जरांगे पाटीलांचे केले कौतुक

खासदार इम्तियाज जलाल यांनी धनगर आणि मुस्लिम समाज आरक्षणासाठी लोकसभा गाजवत मराठा आरक्षणाचे नेते जरांगे पाटीलांचे केले कौतुक

‌ ‌ (सुनिल नजन अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी) महाराष्ट्र सरकारने धनगर समाजाच्या एसटी आरक्षणासाठी केंद्राकडे प्रस्ताव सादर केल्याचे खोटे सांगून धनगर समाजाची फसवणूक करून कशी गद्दारी केली हे औरंगाबाद (संभाजी नगर) चे एम आय एम चे खासदार इम्तियाज जलाल यांनी थेट लोकसभेत सांगितले . खासदार जलाल म्हणाले की प्रुथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री असताना धनगरांचा एसटी आरक्षणासाठी केंद्राकडे प्रस्ताव सादर केला आहे असे खोटे सांगून धनगर समाजाची फसवणूक करून कशी गद्दारी केली आहे हे सिद्ध करून दाखविले. कारण केंद्र सरकारने थेट लोकसभेत सांगितले की महाराष्ट्र सरकारने धनगर एसटी आरक्षणाबाबद कोणताही प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात आलेला नाही.ही सर्व पोलखोल खासदार जलील यांनी लोकसभेत मांडून धनगरांचे दलाल आणि लबाड पुढाऱ्यांचे पितळ उघडे पाडले.महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघांपैकी बारामती, माढा, सातारा, सोलापूर या चार मतदारसंघात धनगर समाजाची लोकसंख्या जास्त आहे.चार खासदार आणि विधानसभेच्या २८८ जागापैकी किमान ४० आमदार हे धनगर समाजाचे होउ शकतात पण धनगर समाजाला कोणीच नेता नसल्याने समाजाची ही अधोगती झाली आहे.मतापुरता जो तो नेता होतो स्वतः ची भलं करतोआणि समाजाची घोर फसवणूक करतो.धनगर समाज सन १९५५ सालापासून एसटी आरक्षणासाठी मागणी करीत आहे.काही लबाड आणि मतलबी लोकांनी धनगर समाजाला एन टी आरक्षणाचे गाजर दाखवून धनगर समाज देशोधडीला लावला. या समाजाला दुसऱ्या राज्यात “धनगड” आणि महाराष्ट्रात “धनगर” म्हटले जाते.महाराष्ट्रात धनगर समाजाची लोकसंख्या किती हे आज मितीला कोणालाही सांगता येत नाही.महाराष्ट्र सरकारने २० नोव्हेंबर २०२३ रोजी धनगर समाजाच्या वतीने आयोजित केलेल्या उपोषणाच्या वेळी असे लिहुन दिले आहे की सरकार एक कमिटी बनवून ती दुसऱ्या राज्यात जाऊन अभ्यास करून अहवाल सादर करेल मग आरक्षण दिले जाईल. सरकारला कोणालाही काही द्यायचे नसेल तर काय एक कमेटी बनवण्याचे नाटकं करायचे आणि प्रश्न प्रलंबित ठेवायचा ही वर्षानुवर्षे चालत आलेली परंपरा आहे.धनगर समाजाच्या वतीने अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकासाठी जालना जिल्ह्यात जागा मागितली आहे तीही सरकार कडून दिली जात नाही.या स्मारकासाठी सरकार तर्फे मोठी जागा देण्यात यावी अशी मागणी खासदार जलील यांनी सरकार कडे केली आहे.धनगर आरक्षणा बरोबर मुस्लिम समाजालाही आरक्षण दिले पाहिजे.मुसलमान हा देशाचा मोठा हिस्सा आहे म्हणून मुस्लिम समाजाला ही आरक्षण दिले पाहिजे अशी मागणी केली आहे.मराठा आरक्षणाचे प्रणेते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील निघालेल्या आरक्षण मोर्चाचे खासदार जलील यांनी कौतुक केले. जरांगे पाटील यांच्या सारख्या एका सामान्य माणसानं महाराष्ट्र सरकारला आरक्षणासाठी दम तोडायला लावला हे ही लोकसभेत आवर्जून सांगितले.मनोज जरांगे पाटलांचा आवाज खा.जलील साहेब यांनी थेट लोकसभेत घुमवला.धनगर समाजाने आरक्षणासाठी विशिष्ठ नेत्यांच्या मागे पळाल्याने एकंदरीत धनगर समाजाची फसवणूक केली जात आहे हे सिद्ध झाले आहे.धनगर समाजाला या सरकारने एसटी आरक्षण दिले नाही तर धनगर समाजाने सरकारच्या बाजूने उभे राहिलेल्या लोकांना अजिबात मतदान करू नये.आरक्षणाच्या नावाखाली धनगर समाजातील अनेक दलालांनी धनगर समाजाला आपापल्या परीने अनेक लबाड पुढाऱ्यांच्या दावणीला बांधण्याचं मोठपापं केले आहे. या निवडणुकीत त्याची परतफेड करण्याची वेळ आली आहे.धनगर समाजाच्या आरक्षणासाठी खासदार सुप्रिया सुळे, खासदार फौजिया खान, आणि इम्तियाज जलाल यांनी लोकसभेत धनगरांचे आरक्षणासाठीचे प्रश्न मांडून धनगरांचे हीत जोपासलं आहे.मुस्लिमांना प्रस्थापीत जातीय वाद्यांनी सतत कमी लेखलं आहे पण धनगरांचा एसटी आरक्षणासाठीचा खरा आवाज मुस्लिमांनीच लोकसभेत मांडून धनगर समाजाचे अप्रत्यक्ष रीत्या प्रतिनिधित्व केले आहे.हे दिसून येत आहे.येणाऱ्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीत नेमकं कोणाला मतदान करायला पाहिजे हे समाजाने ठरवलं पाहिजे.आणि धनगर समाजाच्या दलालांना पाणी पाजले पाहिजे.कारण धनगर समाजाचे अनेक ठेकेदार समाजाच्या नावानं नेतेगीरी करून आपलं उखळ पांढरे करून घेत आहेत.हे सामान्य लोकांनी ओळखून त्यांना त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे.संपुर्ण महाराष्ट्रात या दलालांचा सुळसुळाट झाला आहे.म्हणून वर्षानुवर्षे धनगर समाजाची फसवणूक होत आहे.