Home महाराष्ट्र सोयगाव : अत्यंत गरीब आणि संघर्षमय परिस्थितीतून जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर...

सोयगाव : अत्यंत गरीब आणि संघर्षमय परिस्थितीतून जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर सोयगाव शहरातील रामचंद्र अशोक लाठे (SRPF) मध्ये निवड

सोयगाव : अत्यंत गरीब आणि संघर्षमय परिस्थितीतून जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर सोयगाव शहरातील रामचंद्र अशोक लाठे (SRPF) मध्ये निवड

 

 

 

सोयगाव, दत्तात्रय काटोले.

सोयगाव : अत्यंत गरीब आणि संघर्षमय परिस्थितीतून जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर सोयगाव शहरातील रामचंद्र अशोक लाठे यांनी राज्य राखीव पोलीस दल (SRPF) मध्ये निवड मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. तब्बल १२ वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर मिळालेल्या या यशामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

गरीब कुटुंबातील रामचंद्र लाठे यांच्या आई-वडिलांनी नागवेली उत्पादनासह शेती करून अत्यंत हालअपेष्टा सहन करत मुलाच्या शिक्षणासाठी कष्ट घेतले. आई-वडिलांच्या त्यागाचे आणि मेहनतीचे चीज करत रामचंद्र यांनी अखेर SRPF मध्ये निवड मिळवून आपल्या कुटुंबाचे स्वप्न पूर्ण केले आहे. त्यांनी १८३ गुण मिळवत हे घवघवीत यश संपादन केले.

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण आणि सराव सुरू ठेवताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला, मात्र अपयशाने खचून न जाता आत्मविश्वास आणि कठोर मेहनतीच्या बळावर त्यांनी यशाला गवसणी घातली. आमखेडा येथील फौजी कृष्णा सपकाळ आणि प्राध्यापक सचिन विष्णू ढगे यांच्या मार्गदर्शनाखाली कुरुक्षेत्र अकॅडमीमध्ये त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी केली. विद्यार्थ्यांच्या यशासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या अकॅडमीच्या मार्गदर्शनामुळेच हे यश शक्य झाल्याची भावना व्यक्त होत आहे.

रामचंद्र लाठे यांच्या यशामुळे कुटुंबीय, मित्रपरिवार आणि नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सर्व स्तरातून त्यांचे कौतुक केले जात आहे. “मेहनत, चिकाटी आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर कोणतेही यश मिळवता येते,” हे त्यांनी आपल्या यशातून सिद्ध करून दाखवले आहे.

यावेळी कुरुक्षेत्र अकॅडमीचे शिक्षक सचिन विष्णू ढगे म्हणाले, “आज बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी रामचंद्र लाठे यांचा आदर्श घ्यावा. गरीब परिस्थिती असूनही त्यांनी कधी हार मानली नाही. सातत्याने अभ्यास, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी SRPF सारखी परीक्षा उत्तीर्ण करून नोकरी मिळवली. विद्यार्थ्यांनीही त्यांच्या प्रमाणे ध्येय निश्चित करून मेहनत घेतली तर यश निश्चित मिळेल.”

गरीब कुटुंबातील मुलांसाठी रामचंद्र लाठे यांचे यश प्रेरणादायी ठरत असून संघर्षातूनही मोठे स्वप्न पूर्ण करता येते, हा सकारात्मक संदेश त्यांच्या यशातून समाजाला मिळत आहे.

Don`t copy text!