हिंद मराठा महासंघ खानदेश प्रदेश अध्यक्ष पदी सोपान गव्हांडे पाटील सारखा कुशल संघटक लाभला – गजाननराव साळुंखे

हिंद मराठा महासंघ खानदेश प्रदेश अध्यक्ष पदी सोपान गव्हांडे पाटील सारखा कुशल संघटक लाभला – गजाननराव साळुंखे

 

नंदुरबार ( प्रतिनिधी) हिंद मराठा महासंघ राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले राष्ट्रीय अध्यक्ष उज्वलसिंह राजे गायकवाड राष्ट्रीय सरचिटणीस उद्योजक विजयराव कदम यांच्या सूचनेनुसार उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष पदी सोपान पुंडलिक गव्हांडे पाटील यांची निवड महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष गजाननराव साळुंखे यांनी ही निवड जाहीर केली
या वेळी बोलताना समाज नेते उद्योजक हिंद मराठा महासंघ प्रदेश कार्याध्यक्ष गजाननराव साळुंखे यांनी सांगितले कोरोना महामारी काळात रुग्णांसाठी ४ रुग्णवाहिका त्यांनी मोफत चालवल्या मराठा प्रतिष्ठान या संस्थेचे अध्यक्ष पदी नियुक्ती २०१२ साली त्यांनी समाजाला उपयुक्त काम केले आहे मोफत वह्या वाटप पाण्याचे तालुक्यात हौद बांधले असून पाणी टंचाई मुक्त आपले गाव केले कोरोणा योद्धा याना सन्मानित केले असुन विविध प्रकारचे सामाजिक स्तुत्य उपक्रम राबविले आहेत त्यांचा निवडीचे विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले असुन पुढील वाटचालीस शुभेच्छा सदिच्छा व्यक्त केल्या आहेत लवकरच धुळे येथे हिंद मराठा महासंघ उत्तर महाराष्ट्र भव्य मेळावा आयोजित करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन खानदेश विभागीय अध्यक्ष सोपान पुंडलिक गव्हांडे पाटील यांनी सांगितले
त्यांच्या निवडीची घोषणा होताच देशभरातून अनेक पदाधिकारी कार्यकर्ते यांनी अभिनंदन केले असुन पुढील वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या राष्ट्रीय उपाध्यक्ष ऍड आनंदराव भोसले राष्ट्रीय सचिव देवेश माने गुजरात राज्य अध्यक्ष प्रदीप मोरे कोकण प्रदेशाध्यक्ष निवृत सहाय्यक पोलीस आयुक्त विनोदराव चव्हाण राज्य उपाध्यक्ष अनिल बुवा जाधव राज्य सरचिटणीस संजय जाधव कोकण महीला प्रदेशाध्यक्षा सौ ज्योती लक्ष्मणराव भोसले मुंबई प्रदेश महीला प्रदेशाध्यक्षा श्रीमती भक्ती भार्गव भोसले हिमाचल प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत वाघ कर्नाटक प्रदेश अध्यक्ष आनंदराव घोरपडे रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस अंकुश चाळके सचिव रामचन्द्र गायकवाड आदी मान्यवरांसह पदाधिकारी कार्यकर्ते यांनी अभिनंदन केले आहे