Home जळगाव चाळीसगाव तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र शिरसगाव येथे राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम...

चाळीसगाव तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र शिरसगाव येथे राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न

चाळीसगाव तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र शिरसगाव येथे राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न

 

 

 

चाळीसगाव, दि. १६ मे २०२६ : राष्ट्रीय डेंग्यू दिवसानिमित्त आज शनिवार, दि. १६ मे २०२६ रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र शिरसगाव व अंतर्गत गावांमध्ये विविध जनजागृती उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. “आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळा” हा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचवत डेंग्यू व इतर कीटकजन्य आजारांविषयी व्यापक आरोग्य शिक्षण देण्यात आले.
हा कार्यक्रम जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर तसेच जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. प्रमोद सोनवणे यांच्या सूचनेनुसार राबविण्यात आला. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत बोरसे, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुजित भोसले, डॉ. सुप्रिया पाटील, आरोग्य पर्यवेक्षक किरण बेलदार, आरोग्य निरीक्षक शितोळे नाना, कुलकर्णी नाना, आरोग्य सहायिका दराडे, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी पगारे नाना तसेच औषध निर्माण अधिकारी संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.
यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र शिरसगाव येथे नागरिकांना डेंग्यू प्रतिबंधाबाबत हस्तपत्रिकांचे वाटप करण्यात आले. तसेच डेंग्यूविषयी माहितीपर बॅनरद्वारे जनजागृती करत डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी घर परिसर स्वच्छ ठेवणे, साचलेले पाणी त्वरित काढून टाकणे, पाण्याची भांडी झाकून ठेवणे, कुलर व टाक्या नियमित स्वच्छ करणे याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
आरोग्य विभागाच्या वतीने नागरिकांना “आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस” पाळण्याचे आवाहन करण्यात आले. या उपक्रमातून प्रत्येक नागरिकाने आपल्या घरातील व परिसरातील पाणीसाठे तपासून डासांची पैदास होणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले.
कार्यक्रमास ओपीडी विभागातील आरोग्य सेविका पाटील सिस्टर, जी.ए.एन.एम. वळवी सिस्टर, शिपाई पूजा ताई, डीईओ माहीन शेख, आशाताई तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरिकांनीही या जनजागृती उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद देत डेंग्यू प्रतिबंधासाठी आरोग्य विभागास सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

Don`t copy text!