पाचोऱ्यात मंत्री गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न
पाचोरा : राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त पाचोरा शहर भारतीय जनता पार्टीतर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून रक्तदान केले. सामाजिक बांधिलकी जपत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात आले.
या प्रसंगी भाजपा युवा नेते अमोल भाऊ शिंदे, संजय नाना वाघ, भाजपा नेत्या वैशाली ताई सूर्यवंशी, जिल्हा उपाध्यक्ष मधुकर भाऊ काटे, व्यापारी आघाडी जिल्हाध्यक्ष रमेश काका वाणी, जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप बापू पाटील, माजी सभापती बन्सीलाल बापू पाटील, पाचोरा नगरपालिका गटनेते सुरज भाऊ वाघ, माजी नगरसेवक वासुदेव आण्णा महाजन, माजी नगरसेवक दत्ता भाऊ जडे, अनिल धना पाटील, पाचोरा शहराध्यक्ष दिपक भाऊ माने, सरचिटणीस जगदीश पाटील, समाधान मुळे, महेश माळी, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष योगेश ठाकूर, शुभम पाटील, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस गणेश पाटील, युवा मोर्चा शहराध्यक्ष रोहन मिश्रा, नगरसेवक टिपू देशमुख, वीरेंद्र चौधरी, उमेश माळी, संदीप पाटील, विजय महाजन, पवन जडे, संदीप जैन, विनोद पाटील, स्वप्नील भोसले, संदीप सराफ, गणेश झानझोटे, भावेश पटेल, वाल्मिक जाधव यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
रक्तदान हेच श्रेष्ठदान असून गरजू रुग्णांसाठी रक्ताची आवश्यकता लक्षात घेऊन आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरातून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी रक्तदात्यांचे अभिनंदन करत अशा सामाजिक उपक्रमांमध्ये युवकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे, असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन पाचोरा शहर भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी केले होते. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.






















