Home जळगाव विनोबा तर्फे एप्रिल २०२६ “पोस्ट ऑफ द मंथ” जिल्हास्तरीय कार्यक्रम उत्साहात संपन्न

विनोबा तर्फे एप्रिल २०२६ “पोस्ट ऑफ द मंथ” जिल्हास्तरीय कार्यक्रम उत्साहात संपन्न

विनोबा तर्फे एप्रिल २०२६ “पोस्ट ऑफ द मंथ” जिल्हास्तरीय कार्यक्रम उत्साहात संपन्न

जळगाव : विनोबा तर्फे आयोजित एप्रिल २०२६ महिन्याचा जिल्हास्तरीय “पोस्ट ऑफ द मंथ” कार्यक्रम आदरणीय श्रीमती करिष्मा नायर मॅडम मुख्य कार्यकारी अधिकारी व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सन्माननीय श्री रणधीर सोमवंशी साहेब यांच्या शुभहस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

 

या कार्यक्रमात जिल्ह्यातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांचा “पोस्ट ऑफ द मंथ”, “स्पेलिंग बी”, “महावाचन – कविता सादरीकरण”, “महावाचन – कथा सादरीकरण” तसेच “सकाळची सभा” या विविध उपक्रमांमध्ये उल्लेखनीय कामगिरीबद्दल गौरव करण्यात आला.

 

या उपक्रमामुळे शिक्षकांना प्रेरणा, प्रोत्साहन आणि नाविन्यपूर्ण शैक्षणिक कार्यासाठी नवी ऊर्जा मिळत असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. हा उपक्रम केवळ सन्मानापुरता मर्यादित नसून जिल्ह्यातील इतर शिक्षकांना प्रेरित करणारे प्रभावी व्यासपीठ ठरत असल्याचेही सांगण्यात आले.

 

“पोस्ट ऑफ द मंथ” पुरस्कारासाठी श्रीमती अश्विनी कांबळे (जि. प. प्राथमिक शाळा देऊळगाव, ता. जामनेर), श्रीमती योगिता साहेबराव बडगुजर (जि. प. प्राथमिक शाळा रायपूर, ता. रावेर), श्रीमती रूपाली मोरे (जि. प. मुलींची प्राथमिक शाळा अडावद, ता. चोपडा), श्रीमती रेखा पाटील (जि. प. शिवाजी आदर्श प्राथमिक शाळा हातेड बुद्रुक, ता. चोपडा) आणि श्रीमती कविता वाघ (जि. प. प्राथमिक शाळा जळू, ता. एरंडोल) यांचा सन्मान करण्यात आला.

 

तसेच “स्पेलिंग बी” स्पर्धेमध्ये श्रीमती वैशाली बोरसे (जि. प. प्राथमिक शाळा मोंढाळे पिंपरी, ता. पारोळा), श्री विजय बागुल (जि. प. उच्च प्राथमिक शाळा वराड बुद्रुक, ता. धरणगाव), श्रीमती मनीषा अहिरे (जि. प. मराठी बॉईज नं. २ शाळा फैजपूर, ता. यावल), श्री राहुल पाटील (जि. प. प्राथमिक शाळा बिडगाव, ता. चोपडा), श्री चंद्रकांत विसपुते (जि. प. प्राथमिक शाळा करमाड, ता. जामनेर), श्रीमती नीता काकर (जि. प. शाळा घोडसगाव पुनर्वसन, ता. मुक्ताईनगर) आणि श्रीमती पल्लवी शिंदे (जि. प. शिवाजी आदर्श प्राथमिक शाळा हातेड बुद्रुक, ता. चोपडा) यांनी उत्कृष्ट यश संपादन केले.

 

“महावाचन – कविता सादरीकरण” विभागात श्रीमती शितल सोनार (जि. प. केंद्र शाळा सोनवद बुद्रुक, ता. धरणगाव), श्रीमती अनिता शिंगारे (जि. प. प्राथमिक शाळा तोरणाळे, ता. जामनेर), श्रीमती उमा वानखेडे (जि. प. प्राथमिक शाळा जळू, ता. एरंडोल) आणि श्री जितेंद्र पाटील (जि. प. प्राथमिक शाळा मोरगाव खुर्द, ता. रावेर) यांचा गौरव करण्यात आला; तर “महावाचन – कथा सादरीकरण” विभागात श्री विनोद धनगर (जि. प. मराठी शाळा सारोळे बुद्रुक, ता. पाचोरा), श्रीमती शितल पाटील (जि. प. प्राथमिक शाळा नं. २, एरंडोल) आणि श्रीमती शारदा पाटील (जि. प. प्राथमिक शाळा खंडाळे, भुसावळ) यांनी विशेष कामगिरी नोंदवली.

 

“सकाळची सभा” उपक्रमात श्रीमती योगिता लोखंडे (जि. प. केंद्र प्राथमिक शाळा पिंपरी खुर्द, ता. धरणगाव) यांनी उल्लेखनीय कार्य करत विशेष सन्मान प्राप्त केला.

 

या कार्यक्रमास विनोबाचे जिल्हा समन्वयक हितेश भालेराव व सचिन ससाणे उपस्थित होते.

 

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व शिक्षक, शिक्षण विभागातील अधिकारी व विनोबा टीमचे कौतुक करण्यात आले.

Don`t copy text!