गो.पु.पाटील,विद्यालयात स्व.अशोक हरि पाटील यांच्या स्मृतीस १८ व्या पुण्यस्मरणार्थ अभिवादन

गो.पु.पाटील,विद्यालयात स्व.अशोक हरि पाटील यांच्या स्मृतीस १८ व्या पुण्यस्मरणार्थ अभिवादन…!!!

कोळगाव ता.भडगाव – कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्था भडगाव,संचलीत,गोपीचंद पुना पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय तसेच कला व विज्ञान महाविद्यालय,कोळगाव येथे संस्थेचे दिवंगत अध्यक्ष स्व.अण्णासाहेब अशोक हरि पाटील यांच्या १८ व्या पुण्यस्मरणार्थ अण्णासाहेबांना वंदन व पुजन करुन अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात देवी सरस्वती,स्व.तात्यासाहेब,स्व.कमल आजी,स्व.युवराज दादा,स्व.अशोक आण्णा,स्व.साधनाताई आदिंच्या प्रतिमेस पुष्पहार तसेच श्रीफळ वाढऊन पुजन करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्राचार्य सुनिल पाटील,पर्यवेक्षक अनिल पवार,वरिष्ठ महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य परमेश्वर बाविस्कर,क.म.कार्यवाहक रघुनाथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक-शिक्षिका,प्राध्यापक-प्राध्यापिका,शिक्षकेतर कर्मचारी बंधु-भगिनींनी मेहनत घेतली.