गो. से .हायस्कूल पाचोरा येथे इयत्ता दहावी उत्तीर्ण प्रथम पाच विद्यार्थ्यांचा सत्कार

गो. से .हायस्कूल पाचोरा मध्ये इयत्ता दहावी उत्तीर्ण प्रथम पाच विद्यार्थ्यांचा सत्कार

पाचोरा ( प्रतिनिधी)
मार्च 2023 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत प्रथम पाच क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा शालेय समिती चेअरमन खलील देशमुख यांच्या हस्ते गुणपत्रक शाळा सोडल्याचा दाखला व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
शाळेतून प्रथम वाघ श्वेता अनिल, द्वितीय शेंडे श्रद्धा योगेश, तृतीय मांडगे पुष्कर दादाभाऊ, चतुर्थ सुतार मैत्रेयी प्रवीण, पाचवा पाटील वैष्णवी शरद. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी खलील देशमुख व ज्येष्ठ संचालक भागवत महालपुरे यांनी मार्गदर्शन केले. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ पी एम वाघ उप मुख्याध्यापक एन. आर .पाटील, पर्यवेक्षक ए .बी. अहिरे, पर्यवेक्षक आर .एल .पाटील ,पर्यवेक्षिका सौ ए आर गोहिल सांस्कृतिक विभाग प्रमुख आर. बी .तडवी व इयत्ता दहावीचे सर्व वर्गशिक्षक उपस्थित होते ज्येष्ठ शिक्षक बी .एस .पाटील .यांनी सूत्रसंचालन केले तर आर. बि. तडवी यांनी आभार व्यक्त केले. यावेळी पालकांचाही सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसत होते.