पाचोरा शालेय क्रिकेट स्पर्धेत सलग चौथ्यांदा राज्यस्तरावर निवड
दिनांक 25 नोव्हेंबर 2025 रोजी जळगाव येथे अनुभूती इंटरनॅशनल स्कूलच्या क्रीडांगणावर शालेय विभागीय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते . त्यामध्ये जळगाव जिल्ह्याकडून न्यू बुरहानी इंग्लिश मीडियम स्कूल पुनगाव रोड पाचोराच्या सतरा वर्ष आतील विद्यार्थिनींनी नाशिक येथील संघाला उपांत्य फेरीत 10 गडी राखून रोमहर्षक विजय मिळवून सलग चौथ्यांदा राज्यस्तरावर आपले स्थान निश्चित केले. त्यांची राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा 2 ते 4 डिसेंबर 2025 या दरम्यान शिर्डी येथे होणार आहे. या विजयी संघाला शाळेचे प्राचार्यश्री डी.पी.देवरे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले तसेच या संघाला घडवण्यासाठी शाळेचे मेहनती, कुशल असे सर्वगुणसंपन्न श्री अभिषेक विलास भावसार व पंकज पाटील यांच्याकडून प्रशिक्षण मिळाले .मुलींच्या या घवघवीत याबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री हातिमभाई बोहरी सर, संस्थेचे सचिव श्री मोहम्मदभाई बोहरी सर, न्यू बुऱ्हानी स्कूलचे चेअरमन श्री मुस्तफाभाई भडगाववाला सर ,व्हाईस चेअरमन श्री मुनव्वरभाई बदामी सर तसेच बुऱ्हानी इंग्लिश मीडियम स्कूलचे चेअरमन श्री ताहेरभाई कपासी सर, व्हाईस चेअरमन श्री मुस्तफाभाई लाकडावाला सर शाळेचे प्रशासक श्री बी. एन.पाटील सर तसेच प्राचार्य श्री डी.पी .देवरे सर ,सुपरवायझर सौ .एस. यु. जगताप मॅडम यांनी सर्व विद्यार्थिनींचे भरभरून कौतुक केले तसेच त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

























