पाचोरा तालुका कोविड आरोग्य सुविधेचा खासदार उन्मेश दादा पाटील यांनी घेतला प्रांताधिकारी दालनात आढावा बैठक संपन्न

पाचोरा तालुका कोविड आरोग्य सुविधेचा खासदार उन्मेश दादा पाटील यांनी घेतला आढावा
प्रांताधिकारी दालनात आढावा बैठक संपन्न : ग्रामीण रूग्णालयात रुग्णांची केली विचारपूस

पाचोरा — नगरपालिका व ग्रामीण भागातील रूग्णांची संख्या, उपलब्ध व्यवस्था, लसीकरण आणि रुग्णांची तपासणी प्रक्रिया गतिमान करण्यासाठी पावले उचलावीत, कन्टेन्टमेंट झोन, ग्रामीण रुग्णालयातील व्यवस्था , रेमडीसिव्हर इंजेक्शन वेळीच उपलब्ध व्हावे.काळाबाजार रोखण्यासाठी खबरदारी घ्यावी अशा सूचना देत खासदार उन्मेश दादा पाटील यांनी तालुका कोविड व्यवस्थेचा आढावा घेत संबंधितांना सूचना केल्या.
आज पाचोरा प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांच्या दालनात ही आढावा बैठक दुपारी तीन वाजता संपन्न झाली. बैठकीला प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, तहसीलदार कैलास चावडे, नगरपालिकेच्या मुख्याधिकारी शोभाताई बाविस्कर ,आरोग्य अधिकारी डॉ.अमित साळुंखे,सहाय्यक गटविकास अधिकारी विलास सनेर, नायब तहसीलदार बि. डी. पाटील, पोलीस निरीक्षक सजन पाटील, भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष,युवा नेते अमोल भाऊ शिंदे, जिल्हा परिषद सदस्य मधुकरभाऊ काटे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी खासदार उन्मेशदादा पाटील यांनी पाचोरा तालुक्यातील रुग्ण संख्या कंटेनमेंट झोन, बेड व्यवस्था, वॅक्सिंन सेंटर ,डेडिकेटेड कोविड सेंटर मधील व्यवस्था यांचा आढावा घेत संबंधितांना प्रभावी आरोग्यसेवा सुविधा देण्याची सूचना केली. तसेच कोविड सेंटर मधील कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने जिल्हा सिव्हिल सर्जन डॉ. नागोजीराव चव्हाण यांना फोनवरून तातडीने येथे कर्मचारी उपलब्ध करून देण्यासंदर्भात आदेशित केले. तसेच रेंमडीसीव्हर इंजेक्शनचा तुटवडा असल्याने तातडीने 50 इंजेक्शन आजच्या आज उपलब्ध करून देण्याबाबत सूचित केले. यावेळी तहसीलदार कैलास चावडे यांनी रुग्णांच्या व व्यवस्थेचा आजची स्थिती प्रास्ताविकात मांडली.
ग्रामीण रुग्णालयातील स्वच्छते बाबत खासदारांचे खडे बोल..

खासदार उन्मेशदादा पाटील यांनी ग्रामीण रुग्णालयातील रुग्णाकडे जाऊन जेवण, औषधी उपचार याबाबत वैयक्तिक विचारपूस केली. यावेळी आम्हाला बाथरूम संडास मधील अस्वच्छतेबाबत अडचण असून याबाबत आपण लक्ष घालावे अशी सूचना रुग्णांनी मांडली खासदार उमेश दादा पाटील यांनी तातडीने नगरपालिका मुख्याधिकारी शोभा परिषद यांना येथे सफाई कामगार उपलब्ध करून रुग्ण परिसराची स्वच्छता ठेवण्याबाबत खडे बोल सुनावले. पाचोरा ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य व्यवस्था योग्य असली तरी येथील अस्वच्छतेबाबत रूग्णांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी गाऱ्हाणे मांडले असून आपण याबाबत लक्ष द्यावे असे प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांना खासदार उन्मेशदादा पाटील यांनी सूचना केली. यावेळी त्यांनी रुग्णालयातील रुग्णाकडे जाऊन जेवण,औषधी उपचार बाबत वैयक्तिक विचारपूस केली. रुग्णांना दिलासा दिला.