श्री.सु.भा.पाटील प्राथमिक विद्यामंदिर येथे हर घर तिरंगा अभियानांतर्गत “महिला मेळाव्याचे”संपन्न

🌈 पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री.सु.भा.पाटील प्राथमिक विद्यामंदिर पाचोरा येथे आज 🇮🇳हर घर तिरंगा🇮🇳 अभियानांतर्गत “महिला मेळाव्याचे”आयोजन करण्यात आले होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी उपक्रमशील शिक्षिका सौ.अरुणा उदावंत मॅडम होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ‌.सौ.राजेश्री पाटील, पालक प्रतिनिधी सौ.ज्योती पाटील,शाळेचे मुख्याध्यापक श्री.अशोक परदेशी सर हे उपस्थित होते.मेळाव्याची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने झाली‌. सर्व मान्यवरांच्या स्वागतानंतर प्रमुख पाहुणे डॉ‌.राजेश्री पाटील यांनी “विद्यार्थी व त्यांचे आरोग्य” या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले.तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमती.अरुणा उदावंत मॅडम यांनी विद्यार्थिनींचे वय व याविषयाचे भान ठेवून पालकांची व शिक्षकांची भूमिका तसेच मासिक पाळीच्या संदर्भात असलेले समज-गैरसमज,कारणे, अंधश्रद्धा यावर विविध अनुभवातून सखोल असे मार्गदर्शन समस्त महिला पालक वर्गास केले.मेळाव्याचे प्रास्ताविक श्रीमती.सारिका पाटील मॅडम यांनी तर सूत्रसंचलन श्रीमती.जयश्री पाटील मॅडम यांनी तर आभार प्रदर्शन श्रीमती.चारुशीला पाटील मॅडम यांनी केले. मेळाव्यास मोठ्या संख्येने महिला पालक वर्ग उपस्थित होता. मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.