खेडगाव ( नंदीचे ) येथे उद्या जिल्हा परिषद सदस्य पदमबापु पाटील यांच्या प्रयत्नातुन होणारे प्राथमिक आरोग्य केंद्राचे भुमिपुजन सोहळा

खेडगाव ( नंदीचे ) येथे उद्या जिल्हा परिषद सदस्य पदमबापु पाटील यांच्या प्रयत्नातुन होणारे प्राथमिक आरोग्य केंद्राचे भुमिपुजन सोहळा

ना.गुलाबराव पाटील ( पालकमंत्री ) व पाटोदा सरपंच भास्कररावजी पेरे-पाटील यांची उपस्थिती

तर आ.किशोरआप्पा पाटील व आ.गिरीशभाऊ महाजन यांच्या शुभहस्ते भुमिपुजन

पाचोरा प्रतिनिधी : अनंत चतुर्दशी चा मुहुर्त साधुन जिल्हा परिषद सदस्य पदमबापु पाटील यांनी त्यांच्या प्रयत्नातुन होणारे खेडगाव ( नंदीचे ) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे भुमिपुजन समारंभ उद्या रविवार दिनांक १९ सप्टेंबर रोजी सकाळी ठिक १०:०० वाजता एच बी संघवी हायस्कुल खेडगाव ( नंदीचे ) येथे संपन्न होणार आहे.

कार्यक्रमाचे अध्यक्ष पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील व व्याख्येते भास्कररावजी पेरे-पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

तर आ.किशोरआप्पा पाटील व आ.गिरीशभाऊ महाजन यांच्या शुभहस्ते प्राथमिक आरोग्य केंद्राचे भुमिपुजन संपन्न होणार असुन कार्यक्रमाला सर्वपक्षीय मान्यवर उपस्थित असणार आहे.

पहिल्यांदाच सर्वपक्षीय मंडळी एका व्यासपीठावर आणि त्यात मुलुख मैदान तोफ गुलाबराव पाटील सोबत भास्कररावजी पेरे-पाटील यांची शाब्दीक फटकेबाजी या समारंभाचे लक्षवेधी बाजु ठरणार आहे ? आगामी जिल्हा परीषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभुमीवरती काही राजकीय दिशा या समारंभातुन कळणार का ? याकडे तालुक्यातील जाणकारांचे लक्ष लागुन राहणार आहे.या कार्यक्रमाचे शिवसेना राष्ट्रवादी व भाजप पक्षाला निमंत्रण दिल्याने याकडे सर्वांचे लक्ष लागुन राहणार आहे.

तसेच ज्यांनी या प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी अथक प्रयत्न व पाठपुरावा करून निधी आणला असे जिल्हा परिषद सदस्य पदमबापु पाटील यांच्या पुढील राजकीय वाटचाल व पाऊलाबाबत सर्वांची उत्सुकता लागुन राहणार आहे.तरी परीसरातील शिवसेना व युवासेना सर्व पदाधिकारी यांनी उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा परिषद सदस्य पदमबापु पाटील यांनी केले आहे.