श्री गो से हायस्कूल पाचोरा येथे 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिवस साजरा

पाचोरा( प्रतिनिधी) पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री गो.से.हायस्कूल, पाचोरा येथे 26 नोव्हेंबर 2025 रोजी संविधान दिवस साजरा करण्यात आला. या प्रसंगी
विद्यार्थ्यांना उद्देशिका वाचून दाखवण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांना संविधान विषयी शाळेचे ज्येष्ठ शिक्षक श्री आर बी बोरसे सर यांनी माहिती दिली
याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री एन आर ठाकरे सर पर्यवेक्षिका सौ अंजली गोहिल मॅडम, पर्यवेक्षक श्री आर बी तडवी शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती संगीता वाघ मॅडम तसेच शाळेतील शिक्षक वृंद उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शाळेचे ज्येष्ठ शिक्षक श्री आर बी बोरसे सर यांनी केले.

























