पाचोरा महाविद्यालयात भारतरत्न डॉ.भीमराव रामजी आंबेडकर व्याख्यानमालेचे आयोजन

पाचोरा महाविद्यालयात भारतरत्न डॉ.भीमराव रामजी आंबेडकर व्याख्यानमालेचे आयोजन

पाचोरा येथील श्री शेठ मु. मा. कला, विज्ञान, व वाणिज्य महाविद्यालय पाचोरा येथे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव व एस. एस. एम. एम महाविद्यालय पाचोरा यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉ. भीमराव रामजी आंबेडकर व्याख्यान माले अंतर्गत ‘समरसता ‘या विषयावर प्रा. डॉ. पंकज कुमार नन्नवरे ,चाळीसगाव यांच्या व्याख्यानाचे आयोजन दिनांक 13.2.2024 रोजी करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. अमोल नाना पाटील (व्यवस्थापन परिषद सदस्य क.ब चौ. उमवी जळगाव )होते .तर, प्रमुख अतिथी म्हणून मा.नानासाहेब व्ही.टी जोशी व्हा. चेअरमन पा.ता.सहकारी शिक्षण संस्था पाचोरा, तथा सिनेट सदस्य क.ब.चौ.उमवी जळगाव श्री भानुदास येवलेकर सिनेट सदस्य क.ब.चौ.जळगाव व श्री अतुलजी नाईक उपस्थित होते प्रा.डॉ पंकज कुमार नन्नवरे यांनी आपल्या व्याख्यानात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकला तर *समरसते* संदर्भात बहुमोल असे मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शिरीष पाटील उप प्राचार्य प्रा.डॉ.वासुदेव वले प्रा.डॉ.जे.डी.गोपाळ डॉ.एस.बी तडवी डॉ. के.एस इंगळे प्रा.डॉ.माणिक पाटील प्रा.वाय. बी. पुरी प्रा.आर.बी वळवी प्रा.अमित गायकवाड डॉ.शारदा शिरोळे आदी उपस्थित होते. तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा डॉ. माणिक पाटील यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. एस. बी.तडवी यांनी केले कार्यक्रमाचे आभार डॉ.के.एस.इंगळे यांनी मानले सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.