पाचोरा येथील स्व. अनिलदादा देशमुख चित्रकला महाविद्यालयाचा निकाल जाहीर

पाचोरा येथील स्व. अनिलदादा देशमुख चित्रकला महाविद्यालयाचा निकाल जाहीर
पाचोरा ( प्रतिनिधी)

कलासंचलनालयातर्फे घेण्यात आलेल्या शासकीय उच्चकला परीक्षा ए. टी. डी. प्रथम वर्षाचा निकाल नुकताच जाहीर झाला असून गतवर्षाप्रमाणेच यंदाही मुलींनी आघाडी घेतली असून महाविद्यालयातून प्रथम क्रमांक अमृता गोविंद पाटील , द्वितीय क्रमांक मयुरी गोकुळ राठोड , तृतीय मयुरी परशुराम पवार उत्तीर्ण झालेत. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या अध्यक्षा सौ.कुसुम मित्रा मॅडम , सचिव श्री. नरेश मित्रा सर ,महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.श्री. संदीप पाटील सर, प्रा. निलेश शिंपी, जेष्ठ कला शिक्षक श्री. जितू काळे, राहुल पाटील, प्रमोद पाटील , शैलेश कुलकर्णी, सुबोध कांतायन,संदीप परदेशी, परशुराम पवार , देसले सर ,राहुल सोनवणे तसेच पालकांनी कौतुक केले.