केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेत नगरदेवळा शाळेच्या ८ विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेत नगरदेवळा शाळेच्या ८ विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

 

पाचोरा: पाचोरा तालुक्यातील गोराडखेडा येथे आयोजित केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेत जिल्हा परिषद उर्दू शाळा, नगरदेवळा येथील ८ विद्यार्थ्यांनी विविध खेळांमध्ये चमकदार कामगिरी करून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. या क्रीडा स्पर्धेत एकूण १८ जिल्हा परिषद शाळा आणि ४ खाजगी शाळांनी सहभाग नोंदवला होता.

 

प्राथमिक शाळा गटात सर्वाधिक प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावून या विद्यार्थ्यांनी शाळेचे नाव उज्ज्वल केले. यशस्वी विद्यार्थ्यांची नावे खालीलप्रमाणे आहेत:

 

आफताब नासीर शाह: पोते उडी (प्रथम)

 

अश्मिरा नईम टिकारी: संगीत खुर्ची (प्रथम)

 

जोबिया इम्रान अली: १०० मीटर धावणे (प्रथम)

 

आसिया शेख अफरोज: लिंबू चमचा (प्रथम)

 

मुनिबा इस्माईल शाह: १०० मीटर धावणे (द्वितीय)

 

आलिया भीकन पठाण: लंगडी दौड (द्वितीय)

 

अयान इरफान अली: १०० मीटर धावणे (तृतीय) आणि लांब उडी (तृतीय)

 

या घवघवीत यशानंतर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्यांनी शाळेत जाऊन विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व त्यांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांना या स्पर्धांसाठी तयार करण्यात मुख्याध्यापक अजहर शेख, नवीदा अंसारी, जावेद रहीम, दिलारा सय्यद, रिजवान शेख, खलील शेख आणि सना अंसारी यांनी मोलाचे परिश्रम घेतले.

 

शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष वसीम गुलाम मोहम्मद आणि उपाध्यक्ष शेख अफरोज रहीम यांनी शिक्षकांचे अभिनंदन केले. “शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांचा सराव यामुळेच हे यश शक्य झाले आहे,” असे प्रतिपादन त्यांनी केले. तसेच भविष्यात खेळाडूंना लागणारे सर्व आवश्यक साहित्य आणि मदत पुरवण्याची ग्वाही देखील त्यांनी दिली.