आव्हाणे येथे स्वयंभू गणेश यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न
(सुनिल नजन चिफब्युरो स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा)
बुद्धीची देवता श्रीगणेश असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील आव्हाणे येथील निद्रिस्त गणपती बाप्पाची यात्रा गुरूवार दिनांक ५ फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाली.पैठणहुन कावडीने आणलेल्या गंगेच्या पाण्याने गणेश देवाला महाअभिषेक करून नंतर महाआरती करण्यात आली. श्रीधर ठोंबळ, ऋषिकेश कुलकर्णी, भानुदास राउत, बापुसाहेब भुसारी, नानासाहेब पवार, सुनिल पुरनाळे यांच्या वतीने केळी,खिचडीचा फराळ आणि महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.दुलेचांद गावचे ह.भ.प. उद्धव महाराज चन्ने यांचे किर्तन झाले.सायंकाळी पालखी मिरवणूक काढण्यात आली होती.या मिरवणूकीत शोभेच्या दारूची आतषबाजी करण्यात आली.रात्री महाराष्ट्रातील प्रसिद्ध नर्तिका मालती इनामदार नारायण गावकर यांच्या लोकनाट्य तमाशाचे आयोजन करण्यात आले होते.दादोबा देव एकतारी भजनी मंडळ आणि भैरवनाथ एकतारी भजनी मंडळ यांनी संपूर्ण रात्रभर जागर केला.तर वैष्णव सेवा आश्रम भजनी मंडळ, हनुमान चालीसा मीत्र मंडळ यांनी मिरवणूकी साठी विषेश सहकार्य केले.शुक्रवार दिनांक ६ फेब्रुवारी रोजी सकाळी जिल्ह्यातून आलेल्या कालाकारांचा हजेरी कार्यक्रम संपन्न झाला.नंतर सायंकाळी ४ वाजता महाराष्ट्रातील नामवंत मल्लांच्या कुस्त्यांचा जंगी हगामा भरवण्यात आला होता.तर सायंकाळी खास महीलांच्या मनोरंजना साठी शिव मल्हार प्रोडक्शन राहुल मोरे निर्मित”स्वप्न सुंदरी”हा कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी जवखेडे खालसा येथील जेष्ठ नेते पोपटराव आंधळे आणि त्यांचे सुपुत्र ॲडव्होकेट वैभवराव आंधळे यांचा गणपती देवस्थान ट्रस्टच्या वतीने सन्मान करण्यात आला.हा यात्रा महोत्सव साजरा करण्यासाठी गणपती मंदिर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष मालोजीराव भुसारी सर, अर्जुनराव सरपते, रामदास दिवटे, अंकुश कळमकर, कारभारी तळेकर, नारायण जाधव, लक्ष्मण मुटकुळे, बाबासाहेब खैरे, तात्या खैरे, दत्तात्रय डुरे, नंदकुमार आहेर, कांता काकडे, शिवाजी आहेर, डॉ.अनिल कोळगे,माउली शिंदे,अशोक शिंदे,बबनराव वाणी,सोमनाथ कळमकर, शशिकांत खरात, बापुसाहेब भुसारी आणि सरपंच रामा वाघमारे यांच्या सह गणपती देवस्थान ट्रस्टचे सर्व आजी माजी विश्वस्त मंडळ, शहापूर,बर्हानपूर, दिंडेवाडी, पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ यांनी विशेष परिश्रम घेतले.नवसाला पावणारा गणपती म्हणून या देवस्थानची सर्व दूर राज्यभर ख्याती पसरलेली आहे.या यात्रेनिमित्त नगर नेवाशाहुन आलेल्या पोलीसांनी नुसती पोपटपंची करत उंटावरून शेळ्या हाकण्याचे काम केले.रस्त्याच्या कडेने दुतर्फा रांगा लागल्या होत्या आणि रस्त्यावर दुचाकी वाहन आडवी तिडवी उभी राहिली होती त्या मुळे वाहतूक व्यवस्था सुरळीत होत नव्हती ते निट करण्याचे सोडून जाड पोलिस मात्र रस्त्यावर अतिक्रमण केलेल्या दुकानात बसून फरसाण वेफर्स वर यथेच्छ ताव मारीत दुकानाचेच संरक्षण करण्यासाठी अतिशय तत्पर असल्याचे दिसुन आले.पोलीस यात्रा बंदोबस्ता साठी आले होते की नुसती टंगळमंगळ करण्यासाठी आणले होते हेच समजेनासे झाले होते.पुढील वेळी पोलिसांना सक्त ताकीद देऊन असे गैरप्रकार होणार नाहीत याची काळजी ग्रामस्थांनी घ्यावी.

























