श्री गो. से. हायस्कूल(MCVC) पाचोरा व TDK Pvt. लिमिटेड नाशिक आयोजीत जिल्हास्तरीय रोजगार भर्ती मेळाव्यात 388 विद्यार्थ्यांची होती उपस्थिती

पा. ता. सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री गो. से. हायस्कूल(MCVC) पाचोरा व TDK Pvt. लिमिटेड नाशिक आयोजीत जिल्हास्तरीय रोजगार भर्ती मेळाव्यात 388 विद्यार्थ्यांची होती उपस्थिती . 322 विद्यार्थ्यांची कंपनीने केली मुलाखतीद्वारे निवड

पाचोरा ( प्रतिनिधी)
आज दिनांक 14 मार्च 2023 वार मंगळवार रोजी श्री. गो. से हायस्कूल पाचोरा येथे एच. एस. सी. व्होकेशनल/ MCVC व TDK Pvt Ltd नाशिक यांच्यातर्फे जिल्हास्तरीय रोजगार भर्ती मेळावा संपन्न झाला.
व्ही.टी.जोशी. व्हाईस चेअरमन पा. ता.सहकारी शिक्षण संस्था, खलीलदादा देशमुख शालेय समिती चेअरमन, . मनोज पाटील HR मॅनेजर TDK Pvt Ltd नाशिक, श्री.लगडे साहेब मॅनेजर TDK Pvt Ltd , रवींद्रभाऊ बराटे भर्ती मेळावा समन्वयक, प्राचार्य सो. प्रमिलाताई वाघ, किमान कौशल्य विभागाचे प्रमुख प्रा.मनिष बाविस्कर, तांत्रिक विभाग प्रमुख श्री. एस.एन. पाटील सर, उपमुख्याध्यापक श्री. एन. आर. ठाकरे सर, श्री आर. एल. पाटील सर पर्यवेक्षक, श्री अजय अहिरे सर पर्यवेक्षक, दैनिक लोकमतचे पत्रकार श्री. महेश कौंडिन्यसर उपस्थित होते.
प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रथम दीप प्रज्वलन करण्यात आले. श्री. रुपेश पाटील सर यांनी स्वागत गीत गाऊन वातावरण मंत्रमुग्ध केले. रोजगार भर्ती मेळाव्याच प्रास्ताविक श्री. मनिष बाविस्कर सर यांनी केले.प्राचार्य सौ.प्रमिलाताई वाघ, नानासाहेब श्री.व्ही.टी. जोशीसर, श्री.खलीलदादा देशमुख, श्री. मनोज पाटील यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.
श्री. मनोज पाटील कंपनी मॅनेजर यांनी पात्र विद्यार्थ्यांस 14 हजार रुपये दरमहा पगार ,कॅन्टीन सुविधा, gpf, आरोग्य तपासणी उपचार सुविधा यावर सविस्तर माहिती दिली.
दिनांक 20 मार्च , 23 मार्च रोजी मुलाखतीस पात्र 322 विद्यार्थ्यांना थेट कंपनीत रुजू होण्यासाठी जॉइनिंग लेटर यावेळी कंपनीने विद्यार्थ्यांना दिले.
मेळावा यशस्वी होण्यासाठी श्री. दिनेश पाटील सर, श्री.शरद माथुरसर, सौ.वैशाली भदाणे मॅडम, श्री.सुनील मणियार सर, श्री.एस.डी.वाणी सर, श्री. गौरव सोनवणे, श्री. धनगर यांनी विशेष परिश्रम घेतले.
पाचोरा ,भडगाव, नगरदेवळा, शेंदुर्णी सह जिल्हातील शिक्षक व विद्यार्थी यावेळी उपस्थित होते. श्री राजेंद्र बोरसे सर, श्री.किरण पाटील सर,,वैशालीताई बोरकर मॅडम,श्री. मनोज राऊळ, श्री. शेळके सर ,श्री. दिगबर महाले सर, हितेंद्र देवरे सर, श्री. देशमुख, श्री.राजू भोसले सर ,श्री. एस.जे पाटील सर यांच्या सोबत विद्यार्थी उपस्थित होते.
रोजगार मेळाव्यास पत्रकार श्री. अनिलभाऊ येवले, श्री. प्रमोद पाटील सर, श्री नंद भाऊ शेलकर, श्री. गणेश शिंदे यांनी सदिच्छा भेट दिली.
सूत्रसंचलन श्री सुनील मनियार सर यांनी तर आभार प्रदर्शन श्री. दिनेश पाटील सर यांनी केले.