व्हॅलेंटाईन डे चा निषेध करत मातृ-पितृ दिवस साजरा श्री साई समर्थ कृपा प्राथमिक शाळेचा स्तुत्य उपक्रम

 

पाचोरा येथील श्री साई समर्थ कृपा प्राथमिक शाळेत मातृ-पितृ पुजन, हळदी-कुंकू व आनंद मेळावा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या संचालिका सौ. सुवर्णा पाटील मॅडम उपस्थित होत्या. तसेच प्रमुख अतिथी समाधान पाटील सर, श्रीमती पांडे मॅडम, विद्या वानखेडे व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच सर्व विद्यार्थ्यांचे माता – पिता मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरूवातीस मान्यवरांच्या हस्ते विद्येचे कुलदैवत सरस्वती व साईबाबांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. त्यानंतर मातृ-पितृ पुजन झाले. यावेळी पालक भावनिक होवून अश्रु अनावर झाले. तसेच या नवीन उपक्रमाबद्दल त्यांनी मुख्याध्यापिका व इतर शिक्षकांचे कौतुकही केले. शिक्षणाला संस्काराची जोड या शाळेत दिली जात आहे. अशी पालकांनी

भावना व्यक्त करत आपल्या मुलांचे उज्वल भविष्य होणार हे खंबीरपणे सांगत शाळेचे कौतुक केले. तसेच कार्यक्रमाला उपस्थित महिला वर्ग व शिक्षक महिला यांनी हळदी-कुंकुच्या कार्यक्रमाने सांगता झाली. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षीका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.