पाचोऱ्यात आंबेडकरी चळवळीतील योगदान देणाऱ्या लढवय्यांचा सन्मान सोहळा

पाचोऱ्यात आंबेडकरी चळवळीतील योगदान देणाऱ्या लढवय्यांचा सन्मान सोहळा

जोगेंद्र कवाडे यांची प्रमुख उपस्थिती….

पाचोरा { प्रतिनिधी }
धम्मोदय बुद्ध विहार विस्तार व सुशोभीकरण निमित्ताने आंबेडकर चळवळीत गेल्या ५० वर्षातील योगदान देणाऱ्या लढवय्या कार्यकर्त्यांचा सन्मान सोहळा  दि. २१ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता शहरातील धम्मोदय बुद्ध विहार, संघमित्रा हौसिंग सोसायटी, जनता वसाहत येथे आयोजित करण्यात आला आहे. या सन्मान सोहळ्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणूम माजी खासदार, लॉंग मार्च प्रणेते तथा पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जोगेंद्र कवाडे, जेष्ठ आंबेडकरी नेते सुरेश सावंत, पाचोरा – भडगाव मतदार संघाचे आमदार किशोर पाटील, पी. आर. पी. चे प्रदेश अध्यक्ष गणेश उन्हवने, कार्याध्यक्ष चरणदास इंगोले, प्रदेश नेते राजु मोरे, जळगांव जिल्हा अध्यक्ष जगन सोनवणे, नाशिक येथील एम. एस. ई. बी. चे अधिक्षक अभियंता संजय खंडारे, आशिर्वाद इन्फ्राचे संचालक मुकुंद बिल्दीकर, माजी नगराध्यक्ष संजय गोहील हे उपस्थित राहणार आहेत. या सन्मान सोहळ्यास परिसरात जास्तीत जास्त समाज बांधव व नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन धम्मोदय बुद्ध विहार समिती संघमित्रा हौसिंग सोसायटी, जनता वसाहत, पाचोरा व प्रविण ब्राम्हणे यांनी केले आहे.