पाचोरा शहरातील सिद्धिविनायक हॉस्पिटलचे 9 व्या वर्षात पदार्पण..!! भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन 

पाचोरा शहरातील सिद्धिविनायक हॉस्पिटलचे 9 व्या वर्षात पदार्पण..!! भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

 

पाचोरा (प्रतिनिधी)

पाचोरा शहरातील कृष्णापुरी भागातील डॉ राहुल झेरवाल यांचे सिद्धिविनायक हॉस्पिटल ला येत्या २६ मे ला ८ वर्ष यशस्वीरीत्या पूर्ण होत आहेत व ९ व्या वर्षात पदार्पण होत आहे. यानिमित्त सिद्धिविनायक हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर राहुल प्रभाकर झेरवाल यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिराचे रक्तदात्यांनी रक्तदान करावे असे आवाहन हॉस्पिटलच्या वतीने करण्यात आले आहे.

 

पाचोरा शहरात कृष्णापुरी भागात डॉ राहुल प्रभाकर झेरवाल हे मागील ८ वर्षांपासून शहर व तालुक्यातील रुग्णांना सेवा देत आहेत. गेल्या ८ वर्षात कित्येक रुग्णांना त्यांनी पीडामुक्त केले आहे. या सिद्धिविनायक हॉस्पिटल मद्दे अनेक आजारांवर उपचार केला जातो. अनेक प्रकारच्या अत्यावश्यक सेवांचा यात समावेश आहे. ऐन कोरोना काळात केली नॉन कोविड रुग्णांची सेवा कोरोना काळात जवळ जवळ सर्व हॉस्पिटल कोरोना बाधित रुग्णांसाठी राखीव झाले असतांना सिद्धिविनायक हॉस्पिटल चे संचालक डॉ राहुल झेरवाल यानी नॉन कोविड

रुग्णांना सेवा दिली. कोरोना काळात सर्वच रुग्ण अतिशय भयभीत झाले असतांना नॉन कोविड रुग्णांना येथे सेवा मिळाल्याने रुग्णांनी समाधान व्यक्त केले अत्याधुनिक सुविधा हॉस्पिटलमध्ये अनेक अत्यावश्यक व आधुनिक सेवा उपलब्ध आहेत. यात डे केअर, IPD, बालरोग विभाग, 5 Para cardiac monitors, ईसीजी, एक्स-रे, Ultrasonic Nebulizer इत्यादी सारख्या सुविधा देखील रुग्णांना पुरविण्यात येतात.

 

अविरत सेवा देण्याचा प्रयत्न करणार: डॉ राहुल झेरवाल

८ व्या वर्धापन दिनाविषयी सिद्धिविनायक हॉस्पिटल च्या

डॉ राहुल झेरवाल यांच्याशी सपर्क केला असता त्यांनी रुग्णांची अविरत सेवा करणार असल्याचे सांगितले तसेच रुग्णांचा त्रास दूर करने हे माझे कर्तव्य असून मी गोर गरीब, गरजूंच्या मदतीसाठी व उपचारासाठी सदैव तत्पर व तयार असेल असे मत त्यांनी व्यक्त केले.

 

रक्तदान शिबिराचे ठिकाण:

सिद्धिविनायक हॉस्पिटल कृष्णापुरी पाचोरा

दिनांक व वेळ:

सोमवार, 26 मे 2026