शेवगाव शहरात बसपाच्या उमेदवारांना प्रचार फेरीत प्रतिसाद

शेवगाव शहरात बसपाच्या उमेदवारांना प्रचार फेरीत प्रतिसाद

 

 

(सुनिल नजन”चिफ ब्युरो”अहमदनगर जिल्हा) आगामी निवडणुकीत अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघात ईव्हीएम मशीन वरील क्रमांक एकचे बहुजन समाज पार्टीचे उमेदवार उमाशंकर शामबाबू यादव यांना शेवगाव शहरात मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मीरी-तिसगाव रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून प्रचार फेरीला सुरुवात करण्यात आली. बसस्थानक परीसर,शिवाजी चौक ,जामा मशिदी परीसर,या ठिकाणी जाउन मतदारांच्या गाठी भेटी घेऊन बसपाचे ईव्हीएम मशिन वरील क्रमांक एकचे उमेदवार उमाशंकर शामबाबू यादव यांच्या निवडणूक निशाणी”हत्ती” या चिन्हावर बटण दाबून बसपाला मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी बसपाचे जिल्हा महासचिव राजू शिंदे, जिल्हा सचिव सुभाष साबळे, जिल्हा उपाध्यक्ष शाहनवाज शेख, अहमदनगर विधानसभा प्रमुख बाळासाहेब काते,प्रभारी गणेश बागल,शेवगाव प्रमुख गौतम चव्हाण, जयसिंग यादव,उदय यादव ,जय मगर यांच्या सह अनेक गावातील कार्यकर्ते उपस्थित होते. बसपाचा एक नंबर चा हत्ती नेमका कुणाला धक्का देणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.