रस्ता अडवून धमक्या देत असल्याचे व्हिडिओ व्हायरल, जवखेडे खालसा येथील महिलेचे जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालया समोर उपोषण सुरू!
(स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) जवखेडे खालसा तालुका, पाथर्डी, जिल्हा अहिल्यानगर येथील राम आणि लक्ष्मण नावाचे दोन वाघ नेहमी त्रास देत असल्याचे दिनांक 23 आणि 30 जानेवारी 2025 रोजी जिल्हा पोलिस अधीक्षक रॉकेशजी ओला साहेब यांना पाथर्डी तालुक्यातील जवखेडे खालसा येथील आशाबाई आदिनाथ वाघ यांनी पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे. त्यांनी पुढे असेही नमूद केले आहे की आम्ही गेल्या वीस वर्षांपासून जवखेडे खालसा येथील या वाघ वस्तीवर राहतो.आम्हाला जाण्या येण्यासाठी गट नंबर 247 व 252 च्या बांदाजवळ असलेल्या रस्त्यावरून जाण्यासाठी राम आणि लक्ष्मण वाघ नावाचे दोन ग्रहस्थ मज्जाव करीत आहेत.तसेच जिवे मारण्याची धमकी ही देत आहेत.सदर रस्ता मोकळा करावा म्हणून पाथर्डीचे तहसीलदार आणि प्रांताधिकारी यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करून सदर शेतवहीवाटीचा जुना रस्ता खुला करून द्यावा असा (मामलेदार कोर्ट ॲक्ट 1906 चे कलम 5(2) अन्वये )खटला चालवून रस्ता केस क्रमांक 63/2023 मध्ये 5/6/2024 रोजी निकाल दिलेला आहे.सदर निकाल www.eqicourts.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.सदर आदेशात असं म्हटलं आहे की अर्जदार यांचा अर्ज अंशतः मान्य करण्यात येत आहे.अर्जदार यांना जवखेडे खालसा तालुका पाथर्डी जिल्हा अहिल्यानगर येथील गट नंबर 247 या शेतजमीनी मध्ये वस्तीवर जाण्या येण्यासाठी जवखेडे खालसा ते मीरी या डांबरी रस्त्यापासून पश्चिमेस वाघ वस्ती रस्त्याने येऊन श्रीधर मोहन वाघ यांच्या वस्तीच्या उत्तर बाजूने व पुढे दक्षिणेस वळून वस्तीचे लगत पश्चिमेस, उत्तरेकडून दक्षिणेकडे जाणे येणे साठी काट्या टाकून अडविलेला जुना गाडीवाट रस्ता खुला करून देण्यात येत आहे.तसेच सामनेवाला यांना त्यांच्या शेतजमिनी मध्ये जाणे येणे साठी अर्जदार यांच्या वस्तीलगत दक्षिण बाजूने असलेल्या जनावरांच्या शेडचा एक सिमेंटचा खांब सरकवून सामनेवाला यांना रस्ता खुला करून द्यावा त्यास अर्जदार आणि सामनेवाला यांनी एकमेकांना हरकत आणि अडथळा निर्माण करू नये.सदर रस्त्यावरील अडथळा अर्जदार आणि सामनेवाला यांनी तात्काळ काढून घ्यावा.असा निकाल पाथर्डीचे निवासी नायब तहसीलदार यांनी दिनांक 5/6/2024 रोजी दिलेला आहे.त्यावेळी पोलिस संरक्षणात रस्ता खुला आणि मोकळा करून दिला होता.पण त्या नंतर पुन्हा राम वाघ व लक्ष्मण वाघ या दोघांनी सदर रस्ता अडवला असुन आम्हाला तो वापरू देत नाही.तसेच जिवे मारण्याची धमकी देतात.त्यामुळे पाथर्डी पोलिस स्टेशनमध्ये दोन तीन वेळा अर्ज दाखल केला होता.पोलिस येतात आणि तात्पुरती समज देऊन निघुन जातात. राम व लक्ष्मण वाघ या दोघांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करून रस्ता मोकळा करून द्यावा असे आशाबाई आदिनाथ वाघ यांनी अहिल्यानगर जिल्हा पोलिस अधीक्षक रॉकेशजी ओला साहेब यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.तसेच पुरावा म्हणून या रस्त्यावरून जाताना राम लक्ष्मण यांनी केलेल्या हाणामारी चे व्हिडिओ ही समाज माध्यमांवर व्हायरल झालेले आहेत.तेही जिल्हा पोलिस अधीक्षक रॉकेशजी ओला साहेब यांना दाखविण्यात आले आहेत त्या मुळे ते नेमकी काय कारवाई करतात या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.या निवेदनाच्या प्रती ग्रामपंचायत जवखेडे खालसा, तालुका पाथर्डी,जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ साहेब, तहसीलदार उद्धव नाईक साहेब, आमदार मोनिकाताई राजळे यांना दिलेल्या आहेत. मुख्यमंत्र्याची लाडकी बहिण असलेल्या सर्व सामान्य महिलेवर ईतका अंन्याय होत असताना सरकार नेमकं काय करतंय हे कळेनासे झाले आहे.”आंधळ दळतंय अन् कुत्र पिठ खातय” अशी या सरकारची अवस्था झाली आहे.असे या प्रकरणावरून दिसून येत आहे.महिलेच्या बाजुने असलेला कायदा येथे कोठेही दिसून येत नाही.हा समस्त नारी जातीचा अपमान आहे. ईतका अंन्याय होत असताना जिल्ह्यातील महीला संघटना नेमकं काय करतात हे एक गुलदस्त्यातील न समजणारे कोडेच आहे.