_भडगाव तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत सु.मा.पाटील,(लाडकुबाई) विद्यालयाच्या संघाचा दबदबा कायम

_भडगाव तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत सु.मा.पाटील,(लाडकुबाई) विद्यालयाच्या संघाचा दबदबा कायम…!!!!_

*भडगाव -* क्रीडा व युवक सेवा संचालनालय,पुणे,जळगाव जिल्हा क्रीडा कार्यालय तथा भडगाव तालुका क्रीडा समितीच्या संयुक्त विद्यमाने रजनीताई देशमुख,महाविद्यालय,भडगाव येथील क्रीडांगणावर भडगाव तालुकास्तरीय मुलांच्या कबड्डी स्पर्धा खेळाडूंच्या मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या.
स्पर्धेत १४ वर्षाआतील मुलांच्या गटात माध्यमिक विद्यालय,कोठलीच्या संघाने गो.पु.पाटील विद्यालय,कोळगाव विरुध्द विजय मिळवला,कोळगाव संघ उपविजयी ठरला,तर तिसऱ्या स्थानी प्रताप विद्यालय,वडगावच्या संघाने यश मिळवले,तर १७ वर्षाआतील गटात लाडकुबाई माध्यमिक विद्यालय,भडगावच्या संघाने चुरशीत पार पडलेल्या अंतिम सामन्यात कृ.दे.पाटील,माध्यमिक विद्यालय,गुढे संघाचा पराभव करत जेतेपद प्राप्त केले,गुढ्याच्या संघास उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले,तर याच गटात ब.ज.हिरण,विद्यालय,कजगाव या संघाने तृतीय स्थान प्राप्त केले,१९ वर्षाआतील गटात सु.मा.पाटील,लाडकुबाई विद्यामंदिर,भडगावच्या संघाने जवाहर कनिष्ठ महाविद्यालय,गिरडा संघाविरुध्द एकतर्फी विजेतेपद प्राप्त केले,गिरड संघास उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले,तर तृतीयस्थानावर माध्यमिक विद्यालय,आमडदे संघाने विजय प्राप्त केला.
स्पर्धा यशस्वीतेसाठी क्रीडा समन्वयक प्रा.डॉ.सचिन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा शिक्षक प्रा.सतीश पाटील,अरुण राजपूत,महेंद्र पाटील,दिपक पाटील,अमीत पाटील,राकेश पाटील,सखाराम वाघ,भिमसिंग परदेशी,गोपाल देशमुख,तुषार पवार,चौधरी सर,निलेश मोरे,रविंद्र महाजन,राष्ट्रीय पंच प्रा.प्रेमचंद चौधरी आदिंनी मेहनत घेतली.
विजयी संघांचे संस्थेचे चेअरमन तथा जिल्हा बँक संचालक प्रतापराव पाटील,संस्थेच्या सचिव तथा दुध फेडरेशनच्या संचालिका डॉ.पुनमताई पाटील,मंत्रालयातील अव्वर सचिव प्रशांतराव पाटील आदिंनी अभिनंदन करुन पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
स्पर्धा यशस्वीतेसाठी रजनीताई देशमुख महाविद्यालयाच्या तेजस पाटील,सपके आदि खेळाडूंनी मेहनत घेतली.