धैर्यशील पाटील याची राज्यस्तरीय बास्केटबॉल संघासाठी निवड

धैर्यशील पाटील याची राज्यस्तरीय बास्केटबॉल संघासाठी निवड

पाचोरा – गिरणाई शिक्षण संस्था संचलित शिंदे इंटरनॅशनल स्कूल चा विद्यार्थी खेळाडु धैर्यशील रामेश्वर पाटील ( इयत्ता- 8 वी )यांची “महा बास्केटबॉल असोसिएशन, महाराष्ट्र” यांच्या अधिपत्याखाली पुणे येथे आयोजित १३ वर्षा आतील मुले व मुली राज्यस्तरीय बास्केटबॉल संभाव्य संघात सलग दुसऱ्यांदा निवड झाली. या निवडीबद्दल त्याचे पाचोरा क्रीडा क्षेत्रातून कौतुक होत आहे.

गिरणाई शिक्षण संस्थेचे चेअरमन तात्यासो पंडितराव शिंदे, सचिव- ॲड. जे. डी.काटकर, सहसचिव प्रा.शिवाजी शिंदे, प्राचार्य विजय पाटील, क्रीडा शिक्षक सुशांत जाधव, जावेद शेख यांनी धैर्यशीय चे कौतुक केले असून त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.