चोपडा महाविद्यालयाच्या ०८ विद्यार्थ्यांची क्रेडिट ऍक्सेस ग्रामीण बँकेत निवड

चोपडा महाविद्यालयाच्या ०८ विद्यार्थ्यांची क्रेडिट ऍक्सेस ग्रामीण बँकेत निवड

चोपडा:येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयातील ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल व क्रेडिट ऍक्सेस ग्रामीण बँक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये’ महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी सहभागी झाले होते. यातून ०८ विद्यार्थ्यांची निवड क्रेडिट ग्रामीण ऍक्सेस बँक मध्ये ट्रेनिंग मॅनेजर म्हणून करण्यात आली.यामध्ये महाविद्यालयातील राहुल राजेंद्र धनगर, महेश अशोक कोळी, अजय अमर अहिरे, लोकेश नरेंद्र बाविस्कर, भूषण किशोर शिंपी, रोहित राजेंद्र सोनवणे, शुभम हिरालाल धनगर, प्रशांत पवार यांचा समावेश आहे.सदर निवड झालेल्या विद्यार्थ्यांना धुळे येथे ट्रेनिंगसाठी पाठविण्यात येणार आहे. याप्रसंगी क्रेडिट ऍक्सेस ग्रामीण बॅंकेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन गौरविण्यात आले. उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी म्हणाले की, आजच्या प्रचंड स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी लहान मोठा रोजगार मिळवून बेरोजगारीवर मात केली पाहिजे. विविध कंपन्यांच्या तर्फे उपलब्ध झालेल्या नवीन संधींचा फायदा आजच्या तरुण पिढीने करून घ्यायला हवा.
यावेळी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचे समन्वयक डॉ.के.डी.गायकवाड यांनी कंपनीविषयीची तसेच कंपनीच्या नियम व अटी याविषयी सविस्तर माहिती दिली. क्रेडिट ऍक्सेस ग्रामीण बँक जळगावचे संचालक श्री.राजू पाटील यांनी याप्रसंगी उपस्थित विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या. बँकेच्या कामकाजाची माहिती त्यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितली.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी. ए.सूर्यवंशी, उपप्राचार्य प्रा.डॉ.ए.एल.चौधरी, क्रेडिट ऍक्सेस ग्रामीण बँक जळगावचे संचालक श्री.राजू पाटील, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचे समन्वयक डॉ.के.डी.गायकवाड तसेच समिती सदस्य डॉ.एम.एल.भुसारे, श्री.डी.डी.कर्दपवार आदि उपस्थित होते.