गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल पाचोरा येथे मातृ पितृ दिन उत्साहात साजरा
14 फेब्रुवारी हा दिवस अनेक ठिकाणी पाश्चात्य संस्कृती नुसार व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा करण्यात येतो. मात्र पाचोरा येथील गुरुकुल इंटरनेशनल स्कूल शाळेत या निकृष्ट संस्कृतीला आढा म्हणून दरवर्षी 14 फरवरी हा दिवस मातृ पितृ दिवस म्हणून साजरा केला जातो.
आज योग वेदांत समिती, पाचोराच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता 4थी ते 7वीच्या पालकांना आमंत्रित करण्यात आले. विद्यार्थ्याना आपल्या जीवनात पालकांचे महत्व सांगून भारतीय परंपरेनुसार विद्यार्थ्यांकडून पालकांचे पूजन करण्यात आले. तसेच सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांचे महत्व जाणून आपण आपल्या पालकांचे आयुष्यभर ऋणी राहून त्यांना आपल्या जीवनात सर्वोच्च सन्मानाचे स्थान देऊ, अशी प्रतिज्ञा केली.
आपल्या पाल्यांकडून पूजन होताना पालक अत्यंत भावूक झाले व शाळेच्या या भारतीय संस्कृतीला जोपासणाऱ्या उपक्रमाचे कौतुक केल्याशिवाय राहू शकले नाही.

























