किसान वासंतिक शिबिर-२०२३ चा सांगता समारोह उत्साहात संपन्न

किसान वासंतिक शिबिर-२०२३ चा सांगता समारोह उत्साहात संपन्न…!!!!

भडगाव (वार्ताहर)-  कर्मवीर तात्यासाहेब हरि रावजी पाटील,किसान शिक्षण संस्था,भडगाव,संचलीत “किसान स्पोर्ट्स अकॕडमी,भडगाव” च्या वतीने इनडोअर हॉल,डी.एड.कॉलेज,भडगाव येथे आयोजीत “किसान समर कॕम्प -२०२३” चा सांगता समारंभ सहभागी खेळाडूंच्या मोठ्या उत्साहात संपन्न झाला.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जळगाव जिल्हा दुध फेडरेशनच्या संचालिका तथा तसेच संस्थेच्या सचिव डॉ.पुनमताई पाटील तर प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्या वैशाली पाटील,मुख्याध्यापक कमलेश शिंदे,प्राचार्या विद्या पवार आदि उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रमुख मान्यवरांच्या हस्ते थोर व्यक्तींचे प्रतिमेस माल्यार्पण तथा पुजन तसेच विद्येची देवता माता सरस्वतीस वंदन व दीप प्रज्वलन करुन करण्यात आले.

वासंतिक शिबिरात प्रशिक्षणासाठी निवडण्यात आलेल्या स्केटींगचे प्रात्यक्षिक रंगारंग कार्यक्रमात सहभागी खेळाडूंनी मोठ्या उत्साहात उपस्थित मान्यवरांच्या समोर सादर केले,त्यांचे थरारक कौशल्य बघून मान्यवरांनी तसेच पालकांनीही दाद दिली.

अकॕडमीच्या वतीने शिबीरासाठी लाभलेले प्रशिक्षक आदर्श क्रीडा शिक्षक प्रा.सतीश पाटील,राष्ट्रीय खो-खो पंच प्रा.प्रेमचंद चौधरी,स्केटींग प्रशिक्षक आतिक साटोटे,यांचा सत्कार करण्यात आला.

किसान स्पोर्ट्स अकॕडमीतर्फे संस्थेच्या डॉ.पुनमताई पाटील यांची भडगाव पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

सदर कार्यक्रम प्रसंगी डॉ.पुनमताई पाटील यांनी मनोगतातून किसान स्पोर्ट्स अकॕडमीतर्फे आयोजीत शिबीरातील सहभागी खेळाडूंचे कौतुक करुन त्यांना घडवणाऱ्या प्रशिक्षकांचे आभार व्यक्त करीत,भविष्यात अजून अकॕडमीतर्फे आयोजीत कार्यक्रमास सहकार्य करण्याचे आवाहन केले.

किसान स्पोर्ट्स अकॕडमीस नानासाहेब प्रतापराव पाटील तसेच मंत्रालयीन उपसचिव प्रशांतराव पाटील,डॉ.पुनमताई पाटील आदिंच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे सर्व प्राचार्य व मुख्याध्यापक,शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचेही सहकार्य लाभत असते.

यावेळी मुख्याध्यापक कमलेश शिंदे यांनीही मनोगतातून अकॕडमीच्या उपक्रमाचे कौतुक करत,स्पोर्ट्समध्ये करिअर करण्याच्या संधी उपलब्ध झाल्या असून मेहनत व चिकाटीने यश प्राप्त होतेच असे मत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचलन राष्ट्रीय खो-खो पंच प्रा.प्रेमचंद चौधरी यांनी केले तर आभार माजी विद्यापीठ खेळाडू प्रा.सतीश पाटील यांनी मानले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी राहुल देशपांडे,शरद पाटील,आतिक सतोटे आदि बंधु-भगिनींनी मोलाचे सहकार्य केले.