नांद्रा जि.प.शाळेतील विद्यार्थ्यांचा किल्ले बनवा स्पर्धैला उत्स्फूर्त प्रतिसाद.

नांद्रा जि.प.शाळेतील विद्यार्थ्यांचा किल्ले बनवा स्पर्धैला उत्स्फूर्त प्रतिसाद.

नांद्रा ता.पाचोरा ता.16येथील मंथन गृप आयोजित स्वर्गीय पो.काॅ.शालिक राठोड यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कवी लेखक-तथा शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री .स्वप्नील बाविस्कर यांच्या संकल्पनेतून , जि.प.प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. मोहीनी पाटील,प्रतिभा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता तिसरी व चौथी या वर्गातील विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांच्या भव्यदिव्य, आकर्षक, नेत्रदीपक, डोळ्यांचे पारणे फेडणारी कलाकृती सादर करत शिवरायांवरील श्रद्धा प्रकट केली., परीक्षक म्हणून मोहन पाटील,पुष्पा बाविस्कर, संदीप पाटील व ज्ञानेश्वर सोनवणे यांनी केले .स्पर्धेचे उद्घाटन सरपंच आशाताई तावडे यांनी फित कापुन केले . यावेळेस उपसरपंच शिवाजी तावडे, ग्रामसेविका अनिता सपकाळे, सामाजिक कार्यकर्ते विनोद तावडे,ग्रा.प.सदस्य योगेश सुर्यवंशी निर्मला पिंपळे हिरालाल सुर्यवंशी,संदीप पाटील उपस्थित होते.स्पर्धा अतिशय चुरशीची असुन शाळेला गटशिक्षण अधिकारी श्री समाधान पाटील व केंद्रप्रमुख यांनी प्रदर्शनाला भेट देवुन शाळेचे व शिक्षकवर्ग व विद्यार्थ्यांचे कौतुक करत शुभेच्छा अन् बक्षीसही दिले.स्पर्धा यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका मोहीनी पाटील प्रतिभा पाटील, स्वाती पाटील, उर्मिला पाटील,व स्मृती साबळे हे परीश्रम घेत आहेत. शालेय व्यवस्थापन समिती, अध्यक्ष स्वप्नील बाविस्कर, उपाध्यक्ष .गणेश सुर्यवंशी ,किरण सोनार,भुरा सातपुते व स्पर्धा आयोजक मंथन गृप सदस्य हे मेहनत घेत आहेत. फोटो………..ना्ंद्रा या.पाचोरा येथील जि.प.शाळेतील विद्यार्थ्यांनी साकारलेल्या गड किल्ल्यांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन करतांना सरपंच आशाताईं तावडे, उपसरपंच शिवाजी तावडे, विनोद तावडे, स्वप्निल बाविस्कर, मोहिनी पाटील.