पाचोऱ्यात श्री. स्वामी समर्थ केंद्रात महाराजांचा प्रकटदिन उत्साहात

पाचोऱ्यात श्री. स्वामी समर्थ केंद्रात महाराजांचा प्रकटदिन उत्साहात

पाचोरा, प्रतिनिधी !
शहरातील संघवी काॅलनी मधील दिंडोरी प्रणित श्री. स्वामी समर्थ अध्यात्मिक व बाल संस्कार केंद्रात दि. २३ मार्च रोजी महाराजांचा प्रकटदिन उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी ८ वाजता केंद्रात भुपाळी आरती, सकाळी १०:३० वाजता नैवेद्य आरती, सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत स्वामी याग यामध्ये श्री. स्वामी चरित्र वाचन व हवन, दुपारी १ ते ३ वाजेपर्यंत महाप्रसाद, सायंकाळी ४ वाजता मराठी सप्तशती वाचन, सायंकाळी ५:३० ते ६:३० वाजेपर्यंत महाराजांची पालखी सोहळा, सायंकाळी ६:३० वाजता नैवेद्य आरती व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. महाराजांच्या प्रकटदिनी परिसरातील असंख्य पुरुष, महिला, युवक, युवती, बालगोपाल यांनी उपस्थिती देवुन महाराजांचे दर्शन घेत आहेत. तसेच शहरातील दत्त काॅलनी स्थित श्री. स्वामी समर्थ साप्ताहिक केंद्रात महाराजांच्या प्रकटदिनानिमित्त दुपारी ३ वाजता मराठी सप्तशती वाचन करण्यात आले. श्री. स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकटदिन उत्साहात साजरा होण्यासाठी पाचोरा केंद्राचे केंद्र प्रतिनिधी गोकुळ पाटील, तालुका प्रतिनिधी राम जळतकर, डी. पी. वाणी, नरेश गर्गे, पितृभक्त सर, संजय पाटील, भरत गायकवाड यांचेसह पुरुष, महिला सेवेकरी यांनी केंद्रात सेवा दिली.