Home महाराष्ट्र राहुरी विधानसभा पोट निवडणुकीत अपक्ष उमेदवार सुर्यभान उर्फ सुरेश दत्तात्रय लांबे यांचा...

राहुरी विधानसभा पोट निवडणुकीत अपक्ष उमेदवार सुर्यभान उर्फ सुरेश दत्तात्रय लांबे यांचा भाजप उमेदवार अक्षय कर्डिले यांना जाहीर पाठिंबा

राहुरी विधानसभा पोट निवडणुकीत अपक्ष उमेदवार सुर्यभान उर्फ सुरेश दत्तात्रय लांबे यांचा भाजप उमेदवार अक्षय कर्डिले यांना जाहीर पाठिंबा

 

 

(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा)

राहुरी विधानसभा मतदार संघातील पोट निवडणुकीत अपक्ष उमेदवार सुर्यभान उर्फ सुरेश दत्तात्रय लांबे यांनी भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांना पाठिंबा देत असल्याचे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना भर सभेत दिले.त्यांनी पाठींबा पत्रावर असं नमूद केले आहे की पिंपरी अवघड गावातील प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी आणि दिवंगत आमदार स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले साहेब यांच्या वरील प्रेमापोटी तसेच पालक मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील,माजी खासदार सुजय विखे पाटील, माजी मंत्री प्राजक्त तनपुरे, आमदार संग्राम जगताप,माझे नातेवाईक नामदेव पांडुरंग ढोकणे पाटील, यांच्या विनंतीला मान देऊन भाजपाचे अधिकृत उमेदवार अक्षय शिवाजीराव कर्डिले यांना गावच्या व तालुक्याच्या विकासासाठी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या निवडनुक प्रचार सभेत मी अपक्ष उमेदवार सुर्यभान उर्फ सुरेश दत्तात्रय लांबे जाहीर पाठिंबा देत आहे. तसेच या पाठींबा पत्रावर १९ मागण्या मांडण्यात आलेल्या आहेत.राहुरी विधानसभा मतदार संघातील सर्व नातेवाईक मित्र मंडळी,व कार्यकर्ते यांनी कोणीही मला मतदान करू नये. माझेच मत मी भाजपचे अधिकृत उमेदवार अक्षय शिवाजीराव कर्डिले यांना त्यांच्या अनुक्रमांक एक चिन्ह “कमळ “या चिन्हा समोरील बटनावर क्लिक करून मतदान करणार आहे.तुम्हीही माझ्या मताशी सहमत व्हाल अशी खात्री आहे.माझे अनुक्रमांक ६ वर ट्रंपेट या चिन्हावर कोणीही मतदान करू नये अशी विनंती करण्यात आली आहे. भाजप उमेदवाराला हा पाठींबा मिळवून देण्यासाठी राहुरीतील गोटुंबे आखाडा येथिल भाजपचे नेते अण्णासाहेब बाचकर यांनी विशेष प्रयत्न केले.यामुळे भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांचे पारडे जड होउ शकते.या पाठींब्यामुळे भाजपच्या गोटात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Don`t copy text!