Home जळगाव चोपडा येथील दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी प्राचार्य प्राध्यापिका डॉ....

चोपडा येथील दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी प्राचार्य प्राध्यापिका डॉ. संध्या सोनवणे विराजमान

चोपडा येथील दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी प्राचार्य प्राध्यापिका डॉ. संध्या सोनवणे विराजमान

 

​चोपडा: येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयाच्या नवनियुक्त प्राचार्य म्हणून प्राध्यापिका डॉ. संध्या महेंद्र सोनवणे यांनी पदभार स्वीकारला आहे. संस्थेचे अध्यक्ष ऍड. संदीप सुरेश पाटील व संस्थेच्या सचिव डॉ.सौ.स्मिताताई संदीप पाटील यांच्या हस्ते प्राचार्य प्राध्यापिका डॉ.संध्या सोनवणे यांचा सत्कार करून त्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले.

नवनियुक्त प्राचार्य प्राध्यापिका डॉ. संध्या सोनवणे यांनी महात्मा गांधी शिक्षण मंडळाच्या संस्थापिका व महाराष्ट्र राज्याच्या माजी शिक्षणमंत्री कै.ना.अक्कासो. शरचंद्रिका सुरेश पाटील तसेच चोपडा शहराचे माजी आमदार व संस्थेचे संस्थापक कै. दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील यांच्या स्मृतिस्थळाला वंदन करून प्राचार्य पदाच्या कामकाजाला सुरुवात केली.

प्राचार्य प्राध्यापिका ​डॉ. संध्या सोनवणे या प्राणीशास्त्र विषयातील तज्ज्ञ प्राध्यापिका असून त्यांचे शिक्षण एम.एस्सी, पीएचडी पर्यंत झाले आहे. त्यांच्याकडे तब्बल ३६ वर्षांचा प्रदीर्घ अध्यापनाचा अनुभव असून, त्यांनी ६ वर्षे ७ महिने प्रभारी प्राचार्य म्हणून यशस्वीरित्या जबाबदारी सांभाळली आहे. यापूर्वी जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या यावल येथील महाविद्यालयात त्यांनी दिलेले योगदान अत्यंत मोलाचे ठरले आहे. त्यांच्या सक्षम नेतृत्वाखाली महाविद्यालयांनी शैक्षणिक, संशोधनात्मक आणि प्रशासकीय क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती साधली आहे. विशेषतः विज्ञान विभागाच्या विकासासाठी आणि प्रयोगशाळा अद्ययावत करण्यासाठी त्यांनी घेतलेली मेहनत वाखाणण्याजोगी आहे. प्राचार्य प्राध्यापिका डॉ. संध्या सोनवणे यांचे अनेक संशोधनपर निबंध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित जर्नल्समध्ये प्रसिद्ध झाले आहेत. तसेच, त्यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अधिसभेवर (सिनेट) सदस्य म्हणूनही कार्य केले आहे.

प्राचार्य प्राध्यापिका ​डॉ. संध्या सोनवणे केवळ एक उत्कृष्ट प्रशासकच नाहीत, तर एक समर्पित प्राध्यापिका म्हणूनही परिचित आहेत. त्यांचा स्वभाव अत्यंत मनमिळाऊ व सहकार्यशील असून सहकारी प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांमध्ये त्या लोकप्रिय आहेत. त्यांच्या आजवरच्या कार्याची दखल घेत विविध २१ संस्थांनी त्यांना पुरस्कारांनी सन्मानित केले आहे.

​डॉ. संध्या सोनवणे यांच्या निवडीबद्दल शैक्षणिक क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयाचा शैक्षणिक दर्जा अधिक उंचावेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

प्राचार्य प्राध्यापिका डॉ. संध्या सोनवणे यांच्या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष अॅड. संदीप पाटील, संस्थेच्या सचिव डॉ. स्मिता संदीप पाटील तसेच उपप्राचार्य प्रा. डॉ. के. एन. सोनवणे, उपप्राचार्य प्रा.डॉ. आर. एम. बागुल, उपप्राचार्य प्रा.डॉ. ए. बी. सूर्यवंशी, समन्वयक डॉ. शैलेशकुमार वाघ, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य पी. एस. पाडवी, पर्यवेक्षक ए. एन. बोरसे, रजिस्ट्रार डी. एम. पाटील यांच्यासह सर्व प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी बंधू -भगिनी आणि विद्यार्थ्यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या.

Don`t copy text!