मान्सूनपूर्व वादळ व पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनाम्याचे आ.किशोर पाटील यांचे आदेश

मान्सूनपूर्व वादळ व पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनाम्याचे आ.किशोर अप्पा पाटील यांचे आदेश

पाचोरा((वार्ताहर) दि,५
पाचोरा व भडगाव तालुक्यात रविवार मान्सूनपूर्व वादळ व पावसामुळे अनेक शेतकरी बांधवांचे केळी मोसंबी निंबु आदी फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असुन यामुळे खरीप हंगाम होण्या पुर्वीच शेतकरी बांधवांचे कंबरडे मोडले आहे. तसेच या वादळात अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत शिवाय विजेचे खांब व तारा पडल्याने काही ठिकाणी २० तास होऊन देखील अद्याप वीज पूरवठा सुरळीत झालेला नाही या सर्व बाबींची तात्काळ दखल घेत आ.किशोर अप्पा पाटील यांनी पाचोरा उपविभागीय अधिकारी डॉ विक्रम बांदल तसेच तहसीलदार कृषी अधिकारी यांना तात्काळ पंचनाम्याचे आदेश दिले असून अहवाल शासनास सादर करण्याचा सूचना दिल्या आहेत.त्या अनुषंगाने आज सोमवार पहाटे पासूनच तलाठी ग्रामसेवकांनी,कृषी सहाय्यक यांनी नुकसानग्रस्त भागाच्या पंचनाम्यास सुरवात केली आहे. तसेच वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना देखील वीज पुरवठा सुरळीत करण्या बाबत आदेश दिले आहेत. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी पंचनाम्यासाठी आलेल्या तलाठी ग्रामसेवक यांचे कडून वस्तुनिष्ठ पंचनामे करून घेण्याचे आवाहन आ.किशोर अप्पा पाटील यांनी केले आहे.
दोन दिवसात पंचनामे पूर्ण करणार-प्रांताधिकारी डॉ.विक्रम बांदल
दरम्यान या संदर्भात पाचोरा भडगाव विभागाचे उपविभागीय अधिकारी डॉ विक्रम बांदल यांना विचारणा केली असता त्यांनी दोन दिवसात पंचनामे पूर्ण करून सविस्तर अहवाल देण्याचे आपण कर्मचाऱ्यांना आदेश दिले असल्याची माहिती दिली असून अहवाल आल्यानंतर तो त्वरित शासनास पाठवण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.