Home पाचोरा तालुका मंथन परीक्षेत जि.प. शाळा भोजेच्या विद्यार्थिनींचे उज्ज्वल यश

मंथन परीक्षेत जि.प. शाळा भोजेच्या विद्यार्थिनींचे उज्ज्वल यश

मंथन परीक्षेत जि.प. शाळा भोजेच्या विद्यार्थिनींचे उज्ज्वल यश

 

पाचोरा (जि. जळगाव) : मंथन परीक्षेत जिल्हा परिषद शाळा, भोजे (ता. पाचोरा) येथील विद्यार्थिनींनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. शाळेच्या तीन विद्यार्थिनींनी राज्य, जिल्हा व केंद्रस्तरावर उत्तम कामगिरी करत शाळेचा गौरव वाढविला आहे.

 

इयत्ता 5 वीतील कु. वैष्णवी जितेंद्र उभाळे हिने 300 पैकी 244 गुण मिळवत राज्यात 28 वा, जिल्ह्यात 11 वा आणि केंद्रात 2 रा क्रमांक मिळवला.

इयत्ता 3 रीतील कु. वैभवी दिलीप पवार हिने 300 पैकी 220 गुण मिळवत राज्यात 40 वा, जिल्ह्यात 21 वा व केंद्रात 3 रा क्रमांक पटकावला.

तसेच इयत्ता 1 लीतील कु. तनु योगेश कुमावत हिने 150 पैकी 92 गुण मिळवत राज्यात 30 वा, जिल्ह्यात 22 वा व केंद्रात 1 ला क्रमांक मिळवला.

 

या तिन्ही विद्यार्थिनींच्या यशाबद्दल केंद्रप्रमुख , शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षक तसेच ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांनींचे व त्यांच्या वर्गशिक्षकांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Don`t copy text!