जागतिक पर्यावरण दिनानिमित्त श्री गो से हायस्कूलमध्ये वृक्षारोपण

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त श्री गो से हायस्कूलमध्ये वृक्षारोपण

पाचोरा ( प्रतिनिधी)
सामाजिक वनीकरण विभाग पाचोरा यांचे तर्फे श्री. गो. से .हायस्कूल पाचोरा येथे आज जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी सामाजिक वनीकरण विभागातील वनक्षेत्रपाल श्रीमती सरिता पाटील व श्री गो.से. हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सौ पी एम वाघ . हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी वडाचे व गुलमोहरचे झाडे शाळेला प्रदान करण्यात आलेत. याप्रसंगी वनपाल भागवत पाटील, वनक्षेत्रपाल श्रीमती सरिता पाटील, व शाळेचे पर्यवेक्षक ए .ब. अहिरे. यांनी आपल्या मनोगतातून पर्यावरण संवर्धन हे काळाची गरज असून प्रत्येक नागरिकाचे ते कर्तव्य आहे. तसेच पर्यावरण संवर्धन कशाप्रकारे केले जाऊ शकते हे सांगितले.
याप्रसंगी शाळेचे उपमुख्याध्यापक एन .आर. पाटील, वनपाल यु .एस .पाटील ,माजी सैनिक उत्तम सिंग निकुंभ, माजी सैनिक ज्ञानेश्वर पाटील, धनराज बोरसे ,कार्यालया अधीक्षक अजय सिनकर, किमान कौशल्य विभाग प्रमुख श्री मनीष बाविस्कर व सर्व शिक्षकेतर कर्मचारी व वन विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.