आमोदा येथे आदिवासी कोळी जमातीचे दैवत महर्षी वाल्मिकी यांच्या पुतळ्याची विटंबना
आमोदा ता.यावल येथे आदिवासी कोळी जमातिचे आराध्य दैवत महर्षी वाल्मिकी यांच्या पुतळ्याचे काही समाज कंटक यांच्या कडून तोडफोड करून विटंबना केली त्या बद्दल त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अन्यथा पुर्ण जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आंदोलने करण्यात येतील असे निवेदन आज रावेर तहसील कार्यालयात आदिवासी कोळी बहुउद्देशीय शिखर संस्था रावेर तालुका रावेर चे पदाधिकारी यांच्या तर्फे देण्यात आले त्या प्रसंगी मनोहर भाऊ कोळी सुलवाडी ( अध्यक्ष ) , विनोद कोळी ( शिवा भाईजी पुनखेडा उपाध्यक्ष ) योगेश्वर कोळी तांदलवाडी ( सचिव ) भुषण तायडे रावेर , संजय कोळी खानापूर संदिप महाले निंभोरा , विनोद कोळी खिर्डी , दिपक तायडे , धनराज कोळी , तुषार कोळी पुनखेडा , भुषण धनगर , दिपक कोळी , रोहित तायडे , सुपडु कोळी थोरगव्हाण , अशोक कोळी वाघोदा खुर्द , साई कोळी तांदलवाडी आणि आदिवासी कोळी जमात बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

















