Home जळगाव चोपडा महाविद्यालयात आयबीपीएसपीओ परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार

चोपडा महाविद्यालयात आयबीपीएसपीओ परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार

चोपडा महाविद्यालयात आयबीपीएसपीओ परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार

 

 

चोपडा : येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयातील पदव्युत्तर वाणिज्य विभाग व संशोधन केंद्रातर्फे आय. बी. पी. एस. पी. ओ. परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आयबीपीएसपीओ परीक्षा उत्तीर्ण महाविद्यालयातील बीकॉमचा माजी विद्यार्थी पवन जगन्नाथ मराठे याने The Institute of Banking Personnel Selection Probationary Officer (PO) परीक्षा उत्तीर्ण करून बँक ऑफ बडोदा मध्ये क्लास वन ऑफिसरची नोकरी मिळविली. त्यांनी प्राप्त केलेल्या यशाबद्दल संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष ॲड. संदीप सुरेश पाटील, सचिव डॉ. सौ .स्मिता संदीप पाटील यांनी पवन जगन्नाथ मराठे याचे कौतुक करत सत्कार केला. तसेच बीकॉमचा दुसरा माजी विद्यार्थी दिगंबर महाजन यांची देखील पोलीस दलामध्ये नियुक्ती झाली त्याबद्दल त्यांचाही स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सौ. संध्या एम. सोनवणे , महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. डी . ए.सूर्यवंशी,उपप्राचार्य प्रा.डॉ. के .एन .सोनवणे, उपप्राचार्य प्रा.डॉ. ए. बी. सूर्यवंशी,समन्वयक डॉ. एस .ए. वाघ, वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. सी. आर. देवरे, सहा प्रा. पी . आय.जैन तसेच विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते.
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष ऍड. संदीप सुरेश पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की,  अतिशय गरीब परिस्थितीतून पुढे आलेला हा विद्यार्थी व त्याने आपल्या गरिबीवर मात करत तसेच संपूर्ण कुटुंबाची धुरा सांभाळत, जिद्द व चिकाटीच्या जोरावर अतिशय चांगली अशी परीक्षा उत्तीर्ण करून क्लास वन ऑफिसर ची नोकरी संपादन केली ही संस्थेसाठी, महाविद्यालयासाठी व विभागासाठी अभिमानाची गोष्ट आहे. यावेळी त्यांनी  विद्यार्थ्यांनी उत्तरोत्तर प्रगती करावी अशा शुभेच्छा याप्रसंगी व्यक्त केल्या.

Don`t copy text!