सारोळा बु- वाघूलखेडा विकास सोसायटी चेअरमन पदी जनाबाई पाटील

सारोळा बु- वाघूलखेडा विकास सोसायटी
चेअरमन पदी जनाबाई पाटील

पाचोरा – तालुक्यातील सारोळा बु – वाघूलखेडा विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांची निवड आज दिनांक 2 रोजी उत्साहात संपन्न झाली. संस्थेच्या चेअरमनपदी जनाबाई सुपडु पाटील तर व्हाईस चेअरमन पदी शांताराम बाबुराव पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, सारोळा बु. वाघूलखेडा विकास सोसायटीत ता. 22 मे रोजी झालेल्या निवडणुकीत सहकार पॅनल विरुद्ध शेतकरी पॅनल यांच्यात सरळ लढत झाली होती. शेतकरी पॅनलचा धुव्वा उडवत सहकार पॅनलचे सर्वच्या सर्व 13 उमेदवार विजयी झाले होते.

नवनिर्वाचित सदस्यांच्या आज ता 2 जून रोजी झालेल्या विशेष बैठकीत पदाधिकाऱ्यांची निवड झाली. या निवडीत चेअरमन पदी जनाबाई सुपडु पाटील व व्हाईस चेअरमन पदी शांताराम बाबुराव पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडी प्रसंगी संस्थेचे सर्व नवनिर्वाचित सदस्य तसेच सहकार पॅनलचे प्रमुख अविनाश दादा देशमुख, मुकुंदा पाटील, अनिल बापू देशमुख, साहेबराव पाटील, खुशालराव देशमुख, किशोर पाटील, शंकर पाटील आदी ग्रामस्थ व स्थानिक नेतेमंडळी तसेच श्री नेहते साहेब आणि सेक्रेटरी अशोक आप्पा वाणी उपस्थित होते.