Home जळगाव म्हसावद येथील ब्राह्मण समाजाकडून आज भगवान परशुराम जयंती उत्साहात साजरी 

म्हसावद येथील ब्राह्मण समाजाकडून आज भगवान परशुराम जयंती उत्साहात साजरी 

म्हसावद येथील ब्राह्मण समाजाकडून आज भगवान परशुराम जयंती उत्साहात साजरी

 

 

जळगाव तालुका अक्षयतृतीया व परशुराम जयंती निमित्त सर्व समाजबांधव यांनी राम मंदिर संस्थान येथे एकत्र जमून मोठ्या उत्साहात आणि आनंदात परशुराम जयंती साजरी केली . सर्व ब्राम्हण समाज बांधवांच्या उत्स्फूर्त उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष उत्साहपूर्ण आणि मंगलमय वातावरण लाभले. समाजातील एकोपा, परंपरा, संस्कार आणि आपुलकीचे सुंदर दर्शन यावेळी घडले. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी आनंदाने सहभाग नोंदवत कार्यक्रम अधिक यशस्वी केला. चांगल्या प्रकारे मिळालेला प्रतिसाद पाहून समाजात समाधान, अभिमान आणि नवचैतन्याची भावना निर्माण झाली. सर्व प्रथम श्री मकरंद वैद्य यांनी प्रास्तविक केले

त्यानंतर समाजातील जेष्ठ सदस्य यांच्या हातून भगवान परशुराम यांच्या प्रतिमचे पूजन करण्यात आले.. त्या नंतर प्रभू रामचंद्र यांच्या मूर्तीचे पूजन आणि महाआरती करण्यात आली.. महापूजनचा कार्यक्रम झाल्यानंतर ब्राम्हण समाज बांधव यांनी प्रत्येकाने आपले मनोगत व्यक्त केले.. महिलांनी देखील त्यांचे मत व्यक्त केले..

म्हसावद गावातील समाज बांधवांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी यावेळी चर्चा करण्यात आली..

तसेच श्री परशुराम ब्राह्मण समाज बहूउद्देशिय सेवा मंडळ यांची स्थापना करण्यात आली. सर्वानुमते पदाधिकारी यांची निवड करण्यात आली.

छोटू उर्फ राजेंद्र जोशी, भूषण वैद्य, मनीष भट, राजेश तिवारी, कृष्णा भट, सौरभ कुलकर्णी, विलास पाठक, सुनील पाठक, सतीश उपाध्ये, उपेंद्र कुलकर्णी, दिनेश पाठक यांची पदाधिकारी म्हणून निवड करण्यात आली..

यावेळी जेष्ठ सदस्य जनार्दन तात्या भट, संजय कुलकर्णी, अविनाश जोशी, सुरेश कुलकर्णी भास्कर जोशी यांनी मार्गदर्शन केले..

मा. गुलाबरावजी पाटील, पालक मंत्री, जळगाव यांनी म्हसावद गावातील ब्राम्हण समाजाला परशुराम जयंती निमित्त शुभेच्छा दिल्या असून समाजाच्या प्रगती साठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले.. तसेच मा. गुलाबरावजी देवकर यांनी देखील परशुराम जयंतीच्या शुभेच्छा दिल्या असून आम्ही गावातील ब्राम्हण समाजाच्या सोबत असून त्यांना आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन दिले आहे..

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विवेक भट, यश जोशी, योगेश पाठक, भावेश पाठक, भूषण भट, अतुल त्रिवेदी, शैलेश त्रिपाठी, मयूर पाठक व इतर समाज बांधव यांनी परिश्रम घेतले..

Don`t copy text!