Home महाराष्ट्र नगरपंचायत अंतर्गत सुमारे १ कोटी २५ लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन

नगरपंचायत अंतर्गत सुमारे १ कोटी २५ लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन

नगरपंचायत अंतर्गत सुमारे १ कोटी २५ लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन

 

 

सोयगाव (प्रतिनिधी) दि.20, शहराच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत सोयगाव नगरपंचायत अंतर्गत सुमारे १ कोटी २५ लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन सिल्लोडचे नगराध्यक्ष अब्दुल समीर अ. सत्तार यांच्या हस्ते संपन्न झाले.

 

या विकासकामांसाठी आमदार अब्दुल सत्तार यांच्या पुढाकारातून जवळपास १ कोटी २५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून, त्याअंतर्गत शहरातील विविध भागांमध्ये पायाभूत सुविधा मजबूत करण्यावर भर देण्यात आला आहे. नागरी दलितेत्तर वस्ती सुधार योजनेअंतर्गत सोयगाव येथील वार्ड क्रमांक ८, शेवळी परिसरात चिल्ड्रन पार्क उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. तसेच दयानंद नगर भागात सिमेंट काँक्रीट नाली बांधकाम करण्यात येणार आहे.

 

याशिवाय शहरातील बायपास रोडजवळ बसस्थानक उभारण्याचा महत्त्वाचा प्रकल्पही या अंतर्गत मंजूर करण्यात आला आहे. अल्पसंख्यांक बहुल नागरिक क्षेत्र विकास योजनेअंतर्गत गावांतर्गत सिमेंट काँक्रीट नाली बांधकामाची कामेही करण्यात येणार आहेत. या कामांचे उद्घाटन नगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्याहस्ते संपन्न झाले.

—————-

“सोयगावच्या विकासासाठी आमदार अब्दुल सत्तार यांनी सातत्याने केलेल्या पाठपुरावा मुळे आज ही कामे प्रत्यक्षात येत आहेत, सुमारे १ कोटी २५ लाख रुपयांच्या या विविध विकास कामांमुळे शहरातील मूलभूत सुविधा अधिक मजबूत होतील आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळेल. आगामी काळातही आमदार अब्दुल सत्तार यांच्या मार्गदर्शन व पुढाकाराने सोयगावचा विकास अधिक वेगाने पुढे नेण्याचा आमचा प्रयत्न राहील,” असे नगराध्यक्ष अब्दुल समीर म्हणाले.”

 

या प्रसंगी शिवसेना उपजिल्हा प्रमुख प्रभाकर काळे, सिल्लोडचे उपनगराध्यक्ष विठ्ठल सपकाळ, नगराध्यक्ष आशाबी तडवी,कुसम बाई दुतोडे,नगरसेवक संतोष बोडखे, रऊफ शेख, भगवान जोहर, राजू दुतोंडे, सोयगावातील सामाजिक कार्यकर्ते कडूबा इंगळे, रमेश इंगळे, सुनील सोनवणे, गजानन तायडे, पंडित महाराज, संतोष मिसाळ, कैलास पिंगळकर, विकास रोकडे, संतोष सोहनी, रत्नाकर सोहनी, महेश दुसाने, नंदू आप्पा सोहनी, यांच्यासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

(फोटो : दत्तात्रय काटोल)

Don`t copy text!