बामसेफचे लोणावळ्यात शनिवार पासून राज्य अधिवेशन

बामसेफचे लोणावळ्यात शनिवार पासून राज्य अधिवेशन

पाचोरा(वार्ताहर) दि,२६
बामसेफचे ३६ वे राज्य अधिवेशन दिनांक २७ व २८ मे रोजी सिंहगड एज्युकेशन सोसायटीचे एम.एच. कॉर्पोरेट ट्रेनिंग सेंटर,लोणावळा जिल्हा पुणे येथे आयोजित करण्यात आले आहे.
केवळ कार्यकर्त्यांसाठी आयोजित केलेल्या दोन दिवशीय अधिवेशानाचे उदघाटन सेवानिवृत्त सत्र न्यायाधीश न्या.विलास बांबर्डे करणार आहेत.उदघाटन सत्राची अध्यक्षता बामसेफचे राष्ट्रीय संघटन सचिव व राज्याचे प्रभारी संजय मोहिते करणार असून प्रस्तावना बामसेफ राज्य अध्यक्ष संजय पगारे व संचालन राज्य महासचिव जे.एच.चव्हाण करतील.
अधिवेशनाचे नियोजन आणि संवाद पद्धती विशेष आणि अनोख्या रीतीने संचालित केल्या जाणार आहे.पहिल्या दिवशी पहिल्या सत्रात ‘संघटनात्मक व्यवहार एक स्वयंमूल्यांकनात्मक चिंतन ‘ या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. समूह चर्चेद्वारे या विषयावर उपस्थित सर्व प्रतिनिधी आपले विचार व्यक्त करतील. विषयाची अध्यक्षता बामसेफ राज्य उपाध्यक्ष मधुकर मेश्राम करतील तर विषयाची प्रस्तावना राज्य संघटन सचिव एम.डी. चंदनशिवे करणार आहेत.
कार्यशाळा क्रमांक दोन मध्ये ‘बिएस 4 अभियानाची उपलब्धता,आव्हाने आणि भविष्यातील कार्ययोजना’ या विषयावर सर्व क्लस्टर समन्वयक आपले मत व्यक्त करतील.या विषयाची अध्यक्षता राज्य उपाध्यक्ष राजू गवई करणार आहेत. या सत्राची प्रस्तावना राजू कांबळे (राज्य उपाध्यक्ष,बामसेफ) तर संचालन रवी मोरे (राज्य उपाध्यक्ष,बामसेफ) करणार आहेत.
दुसऱ्या दिवशी खुल्या प्रबोधन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. ‘मूलनिवासी बहुजन आंदोलनातील महिलांचा सहभाग आणि लैंगिक संवेदना’ या विषयावर प्रणालीताई मराठे,कविता मडावी,प्राची दुधाने मार्गदर्शन करणार आहेत.सादर सत्राची अध्यक्षता बामसेफच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा डॉ. दीपा श्रावस्थी करतील.या सत्राची प्रस्तावना बामसेफ राज्य उपाध्यक्ष नितीन भटकर तर संचालन राज्य उपाध्यक्ष जितेंद्र सूर्यवशी करणार आहेत.
या बरोबरच या अधिवेशनात एक कलाचार सत्र व एका समारोपीय सत्राचे सुद्धा आयोजन करण्यात आले आहे.या सत्रांची अध्यक्षता अनुक्रमे मूलनिवासी सभ्यता संघाचे राज्य अध्यक्ष धीरज गणवीर,प्रदेश प्रभारी संजय मोहिते करणार असल्याचे राज्याचे महासचिव जे.एच. चव्हाण यांनी पत्रकाद्वारे कळविले.
जळगाव जिल्हा पाचोरा येथुन जय वाघ,चेतन नवगिरे, कैलास सोनवणे, प्रशांत सोनवणे, राजेंद्र तायडे,रमेश साळवे,मदन बोरकर,उत्तम गोमटे,इंजी विदयाधर भालेराव,मनोहर गाढे आदि कार्यकर्ते उपस्थित राहून अधिवेशनात सहभाग घेणार आहे.