शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नवनियुक्त पदाधिकारींचा सत्कार

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नवनियुक्त पदाधिकारींचा सत्कार

पाचोरा – येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची पाचोरा व भडगाव तालुका व शहर कार्यकारणी जाहीर करण्यात आली. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशावरून पाचोरा, भडगाव तालुका शिवसेना पदाधीकारीच्या नियुक्त्या करण्यात आल्याने त्यांचा सत्काराचा कार्यक्रम आज दि ११ रोजी पाचोरा शिवसेना कार्यालयात पार पडला.
तालुका व शहर कार्यकारणी पुढील प्रमाणे –
पाचोरा तालुका – उपजिल्हाप्रमुख पदी उद्धव मराठे, तालुका प्रमुखपदी शरद पाटील, उपजिल्हा संघटक पदी विनोद बाविस्कर, उपजिल्हा समन्वयक पदी धर्मराज पाटील, तालुका संघटक पदी देविदास पाटील तालुका समन्वयक पदी ज्ञानेश्वर पाटील, पाचोरा शहर प्रमुख पदी अॅड. दीपक पाटील व अनिल सावंत, शहर संघटक पदी दत्ताभाऊ जडे व राजेंद्र राणा, शहर समन्वयक पदी दादाभाऊ चौधरी व बंडूभाऊ मोरे यांची निवड करण्यात आली.
भडगाव तालुका – उपजिल्हाप्रमुख पदी दीपक पाटील , तालुका प्रमुखपदी अनिल पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुखपदी जे के पाटील उपजिल्हा संघटक पदी शाम पाटील सर व रतन परदेशी, उपजिल्हा समन्वयक पदी गोरख पाटील , तालुका संघटक पदी फकीर पाटील उपतालुका प्रमुखपदी भाऊसाहेब पाटील, शामकांत पाटील व शरद पाटील, तालुका समन्वयक पदी राजेंद्र पाटील, भडगाव शहर प्रमुख पदी शंकर मारवाडी, शहर संघटक पदी अनिल महाजन व निलेश पवार यांची निवड करण्यात आली.
या निवडीबद्दल नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्काराचा कार्यक्रमप्रसंगी शिवसेना नेत्या वैशालीताई सूर्यवंशी, तालुका संपर्क प्रमुख सुनील पाटील, नरेन्द्रसिंग पाटील,रमेश बाफना, योगेंद्रसिंग मोरे, तिलोत्तमा मोरे, अरुण पाटील, राजूभाऊ साळुंखे युवासेना उपजिल्हाधिकारी संदीप जैन, माजी नगराध्यक्ष प्रशांत पवार, माजी नागर्सेवाक दादाभाऊ चौधरी, पप्पू राजपूत, जितेंद्र जैन, अजय पाटील, युवासेना तालुका प्रमुख भूपेश सोमवंशी, गौरव पाटील, जगदीश पाटील, संतोष पाटील सर, नंदू पाटील सर यांच्यासह सर्व पदाधीकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नाना वाघ यांनी केले.