विद्यार्थ्यांमधील सुप्त क्षमता ओळखून त्यांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे – शेख जावेद रहीम
शिक्षकाचे सर्वप्रथम काम म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये दडलेल्या क्षमता शोधून त्यांना प्रोत्साहन देणे आणि नवीन दिशा देणे हे आहे.या नवीन युगात शिक्षकाचे काम अध्यापनापेक्षा विद्यार्थ्यांना योग्य वेळी मार्गदर्शन करणे अधिक महत्त्वाचे आहे.
काही विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड आणि संशोधनाची प्रवृत्ती असते. या प्रवृत्तीचा शोध घेऊन त्यांना योग्य दिशा देण्याची महत्त्वाची जबाबदारी शिक्षकाची आहे.अशा प्रकारच्या विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून आपल्याला मुलांच्या वैज्ञानिक आवडीबद्दल माहिती मिळते. आणि आपल्याला भविष्यात एपीजे अब्दुल कलाम सारखा एखादी वैज्ञानिक मिळू शकतो. हे मत शेख जावेद रहीम यांनी पाचोरा तालुक्यातील निगरदेवळा येथील सरदार एस.के. पवार हायस्कूल या नामांकित शैक्षणिक संस्थेत आयोजित केलेल्या विज्ञान प्रदर्शनादरम्यान व्यक्त केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी सचिव शिव नारायण जाधव हे होते.संचालक हाजी अब्दुल गनी, आदर्श शिक्षक शेख जावेद रहीम आणि वसीम शेख हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. विज्ञान प्रदर्शनी मध्ये पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी मॉडेल्स आणि चार्ट्सद्वारे आलेल्या पाहुण्यांसमोर आकर्षक पद्धतीने वैज्ञानिक माहिती सादर केली.
कार्यक्रमात हाजी अब्दुल गनी, मुख्याध्यापक किरण काटकर, सादिक बिस्मिल्ला यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सचिव शिव नारायण जाधव यांनी विद्यार्थ्यांच्या जबरदस्त प्रदर्शनाबद्दल जोरदार प्रशंसा केली आणि वैज्ञानिक गतिविधींमध्ये नेहमी पुढे राहण्याचे आवाहन केले. त्यांनी उर्दू विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या त्यांच्या 25 वर्षांच्या शैक्षणिक प्रवासातील हे सर्वोत्तम प्रदर्शन असल्याचे घोषित केले.
कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी संजय बावस्कर, मनीषा जाधव मॅडम, प्राध्यापक उमेश काटकर, हिरालाल सर, समाधान ठाकूर, पी आर तायडे ,सय्यद जाकिर अली, कलीम शेख, एहतेशाम शेख, जहांगीर शेख, वकार शेख, अफरोज शेख, मोहसिन मनियार, इरम बेग, यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. कार्यक्रमात मोठी संख्या मध्ये पालक उपस्थित होते.
सूत्रसंचालन शेख इकबाल यांनी केले.
आभार प्रदर्शन शेख सादिक बिस्मिल्ला यांनी केले.
























