पाचोऱ्यात नेरी च्या शेतकऱ्यांचे विविध मागण्यांसाठी उपोषण सूटले

पाचोऱ्यात नेरी च्या शेतकऱ्यांचे विविध मागण्यांसाठी उपोषण सूटले

पाचोरा (प्रतिनिधी) – तालुक्यातील नेरी येथील शेतकऱ्यांचे विविध मागण्यांसाठी जम्बो उपोषण कॉंग्रेस अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली आज सुरू केले होते. तहसीलदार यांनी तात्काळ कारवाई लेखी आश्वासन नंतर शेतकऱ्यांचे उपोषण सोडले.

पाचोरा तालुक्यातील नेरी गावातील २०० शेतकऱ्यांची शेती गडद नदीच्या पलीकडे भडाळी शिवारात आहे. गेल्या चार वर्षांत मृद संधारण विभागाने चुकीचा सर्वे करुन बंधारा बांधला त्यामुळे सदर चा रस्ता हा नेरी ते सार्वे ग्रामीण असुन तो पाण्यात गेल्याने अल्पभूधारक शेतकर्यांना शेतात जाण्यासाठी रस्ता नाही त्यामुळे आमरण उपोषण तहसीलदार कचेरी समोर आज दि. २१ रोजी सुरू केले होते. तहसीलदार कैलास चावडे यांनी संबंधित विभागाला लेखी आदेश दिले यात जिल्हा परिषद ने तात्काळ पुलासाठी अंदाज पत्रक तयार करून शासनाने कडे पाठवण्यात येवुन मृद संधारण विभागाने तात्काळ चौकशी करावी तसेच स्व. धर्मा बेडर यांना मुख्यमंत्री सहायता निधी मधुन मदत करण्यासाठी तात्काळ प्रस्ताव पाठविण्यात येईल असे आश्वासन तहसीलदार श्री चावडे यांनी उपोषणकर्ते शेतकऱ्यांना दिले. यावेळी कॉंग्रेस तालुका अध्यक्ष शेतकरी नेते सचिन सोमवंशी यांना उपोषणकर्त्यांचे प्रतिनिधी म्हणून तहसीलदार श्री कैलास चावडे यांनी सरबत देऊन उपोषण सोडले यावेळी मृद संधारण चे उपविभागीय अभियंता एस डी निकम, नायब तहसीलदार संभाजी पाटील, शिवसेनेचे शेतकरी प्रमुख अरुण पाटील, हरीभाउ पाटील, राजेंद्र महाजन, इरफान मनियार, शरीफ शेख, राहुल शिंदे उपस्थितीत होते. नेरी येथील शेतकरी काशिनाथ अहीरे, बंटी भोई, याकुबखा पठाण, सुनिल पाटील, विजय सुर्यवंशी साहेबराव बोरसे, आधार गढरी, दादाभाऊ मोरे, हेमराज बोरसे, सुरेश गढरी, जिभाउ पाटील, मुकुंदा पाटील, विमलबाई अहीरे, सकुबाई भोई, सरुबाई पाटील, दगुभाई भोई, शरीफाबाई पठाण, मालाताई मोरे.. बालु भोई.. बंडु भोई.. तुकाराम भोई.. भगवान भोई.. आदींसह शंभरहून अधिक पिढीत शेतकरी उपस्थित होते.